शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एसीबी अधिकारी असल्याची बतावणी करून लुटीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:34 IST

एसीबीचे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) अधिकारी असल्याची बतावणी करून ठाण्यातील एका खासगी क्लासच्या शिक्षकांकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात

ठाणे : एसीबीचे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) अधिकारी असल्याची बतावणी करून ठाण्यातील एका खासगी क्लासच्या शिक्षकांकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनोज प्रसाद याच्यासह पाच जणांच्या टोळक्याला नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी यांनी दिली. या पाचही जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.नौपाड्यातील वीर सावरकर मार्गावरील ‘एक्सेल कॉमर्स क्लासेस येथे २८ एप्रिल २०१८ रोजी आल्विन परवेज (३९, रा. ब्रह्मांड, घोडबंदर रोड, ठाणे) या शिक्षकाला मनोजकुमार प्रसाद (रा. वाहतूकनगर अंधेरी, मुंबई), मयूर राणे (रा. वाघबीळ, ठाणे), मिथिलेश मुखिया (रा. सिद्धार्थनगर, अंधेरी, मुंबई), सुरज पवार (रा. सिद्धार्थनगर, अंधेरी, मुंबई) आणि मोहीत वर्मा (रा. वाहतूकनगर, अंधेरी) यांनी आपण एसीबीचे अधिकारी असून तुमच्याकडे रेड पडणार असल्याची बतावणी केली. ‘आमचे साहेब खाली गाडीत थांबले आहेत. तुम्ही खाली चला’, असे त्यांना धमकावले. आल्विन यांनी त्यांच्यासोबत जाण्यास विरोध दर्शवल्यानंतर त्यांच्यापैकी काहींनी त्यांना मारहाणही केली. तिथे सीसीटीव्हीमध्ये चित्रण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या टोळीने तिथून पलायन केले होते. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस नाईक प्रशांत निकुंभ, भागवत थविल, गोविंद पाटील, महेश भोसले आणि कॉन्स्टेबल गोरख पाटील आदींनी २७ मे रोजी पहाटे मोहित वर्मा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मनोजकुमार प्रसाद याच्यासह चौघांना अटक केली. या शिक्षकाला एका वाहनातून नेऊन त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा या टोळीची योजना होती, असेही तपासात उघड होत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. मात्र, यातील सर्व बाजू तपासण्यात येत असल्याचे उपायुक्त स्वामी यांनी सांगितले.