शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित भूखंडांच्या संरक्षणासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:41 IST

अंबरनाथ नगरपालिका आणि सरकारी भूखंडांचे संरक्षण करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. विकास आराखड्यात जे आरक्षण नमूद केले आहे

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका आणि सरकारी भूखंडांचे संरक्षण करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. विकास आराखड्यात जे आरक्षण नमूद केले आहे, त्या भूखंडांचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांनी मागवला आहे. तसेच ज्या भूखंडांवर अतिक्रमण आहे, त्याचाही अहवाल मागवला आहे.अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या आरक्षित भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणचे आरक्षण विकसित करणे पालिकेला अवघड जात आहे. सर्कस मैदानावरील अतिक्रमण तीन वर्षांत सर्वाधिक झाले असून संपूर्ण भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. अशीच काहीशी परिस्थिती शिव मंदिराजवळील महाविद्यालयाच्या भूखंडावरही झाली आहे. त्या ठिकाणीही झोपडपट्टी झालेली असून तेथे कारवाई करण्यात आलेली नाही. शहरात अनेक महत्त्वाच्या भूखंडांवरील स्थिती ही सारखी असल्याने पालिकेने या आरक्षित भूखंडाची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू केले आहे.जे आरक्षित भूखंड विकसित करणे शक्य आहे, त्या भूखंडांची माहिती पालिकेने घेण्यास सुरुवात केली आहे. आरक्षणाच्या यादीतील जे महत्त्वाचे भूखंड आहेत, त्यांची वस्तुस्थिती मागवण्यात आली आहे. तसेच त्या जागेची मोजणीही करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. पालिकेच्या नावावर असलेल्या उताºयांवरून जागेच्या मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर, काही जागा या सरकारच्या ताब्यात असल्याने त्यांची मोजणी करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन ते काम करण्यात येणार आहे.अंबरनाथ नगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाºयांनी आरक्षित भूखंड आणि त्यावरील अतिक्रमणाबाबत अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. कोहोज, खुंटवली येथील रुग्णालयांच्या भूखंडांचा विकास करण्यासाठी पीपीपी तत्त्वावर प्रस्ताव मागवण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या भूखंडांचा पालिकेच्या निधीतून विकास होणे शक्य नसल्याने हे काम हाती घेण्यात आले आहे. रुग्णालयाचा भूखंड विकसित करण्यासाठी रुग्णालय चालवणाºया संस्थांना या कामासाठी पाचारण करण्यात येणार आहे. हा विषय बैठकीत मांडला जाणार आहे.