शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला

By admin | Updated: July 4, 2017 22:28 IST

रामचंद्रनगर, वैतीवाडी परिसरातील फेरीवाल्यांनी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील चौघांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

ऑनलाइन लोकमत ठाणे, दि.04 -  रामचंद्रनगर, वैतीवाडी परिसरातील फेरीवाल्यांनी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील चौघांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. नयन राठोड या अधिकाऱ्यासह रुपेश पांडे, हाफीज शेख आणि बाळा बोरसे या जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून हल्ला करणाऱ्या चंद्रिका तिवारी, संतोष तिवारी आणि संदीप तिवारी या तिघांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.सायंकाळी ४.३० ते ५ वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या लोकमान्यनगर प्रभाग समितीमधील अतिक्रमण विरोधी पथकातील नयन राठोड हे आपल्या काही कर्मचाऱ्यांसह रामचंद्रनगर येथील अनधिकृत फलकांवर कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी तिथे रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना त्यांनी बाजूला होण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तिथून जाण्याऐवजी या पथकाशी हुज्जत घातली. यातून झालेल्या वादावादीतून त्यांनी पथकावर हल्ला केला. पोलीस बंदोबस्ताशिवाय हे पथक कारवाई करीत असल्यामुळे ते फेरीवाल्यांपुढे हतबल ठरले. यात जखमी झालेल्या राठोड यांच्यासह चौघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; तर हल्ला करणाऱ्या चौघांपैकी तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर, निरीक्षक अनघा देशपांडे यांच्या पथकाने अटक केली. त्यांचा चौथा साथीदार बाळू उतेकर पसार झाला आहे. अनेक फेरीवाल्यांवर कारवाई...फेरीवाल्यांच्या हल्ल्यात चार कर्मचारी जखमी झाल्यानंतर तासाभराने पोलीस बंदोबस्तामध्ये आलेल्या पालिकेच्या दुसऱ्या पथकाने अनेक फेरीवाल्यांवर कारवाई केली. दोन महिन्यात दुसऱ्यांदा हल्ला...ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी मंदीराजवळील फेरीवाले आणि दुकानाबाहेर सामान ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर काही फेरीवाले आणि काही गाळे धारकांनी हल्ला केला होता. त्यात माळवी जबर जखमी झाले होते. त्यांच्यावरील या हल्ल्यानंतर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कारवाई अधिक तीव्र करीत फेरीवाले आणि रिक्षा चालक तसेच काही व्यापाऱ्यांवरही पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई केली होती. आयुक्तांच्या कारवाईचे पडसाद पालिकेच्या महासभेतही उमटले होते.