शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा शहर उपाध्यक्षावर हल्ला

By admin | Updated: April 17, 2017 04:40 IST

जमिनीच्या वादातून भाजपाचे कल्याण शहर उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात त्यांचा भाऊ

कल्याण : जमिनीच्या वादातून भाजपाचे कल्याण शहर उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात त्यांचा भाऊ, बहीण आणि अन्य मंडळीही जखमी झाली. याप्रकरणी भोईर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भोईर यांनी ज्यांच्यावर आरोप केला आहे, त्यांनीही भोईर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.कॅटरिंगचा व्यवसाय करणारे भोईर हे उंबर्डे गावात राहतात. ते भाजपाचे कल्याण शहर उपाध्यक्ष असून दोन वर्षांपासून ते या पदावर आहेत. त्यांचा नातेवाइकांशी जमिनीवरून वाद होता. या वादातून त्यांच्या नातेवाइकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा भाऊ भरत भोईर, बहीण सुनीता भंडारी, अन्य एक भाऊ बंडू भोईर हे जखमी झाले. हल्ला करणारे रिव्हॉल्व्हर घेऊन आले होते. त्यांच्याकडे लोखंडी रॉड, चाकू अशी हत्यारे होती. जगदीश भोईर, संदेश भोईर, रामदास भोईर, बळीराम भोईर, स्वप्नील भोईर, योगेश भोईर यांनी हल्ला केल्याचा आरोप शत्रुघ्न यांनी केला आहे. १५ ते २० जणांनी घरात घुसून हा हल्ला केला. हल्लेखोरांनी शत्रुघ्न यांची आई जनाबाई, लहान मुलगी सचिता व प्रतीक यांनाही सोडले नाही. हल्ल्यात जखमी झालेले शत्रुघ्न, भरत आणि सुनीता यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. (प्रतिनिधी)