भिवंडी : सरवलीमध्ये नाकोडा कर्णबधिर शाळेतील विद्यार्थ्याने त्याच शाळेतील मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. हा मुलगा नववीत शिकतो. त्याने अत्याचार केलेली मुलगी आठवीत शिकते. तिला त्याने बुधवारी दुपारी शाळेच्या गच्चीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ते कळताच शाळेतील कर्मचारी महेंद्र तळेले यांनी गुरुवारी दुपारी कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी विद्यार्थ्यास ताब्यात घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार बालसुधारगृहात दाखल केले. हा मुलगा मूळचा नवी मुंबईत राहणारा आहे. शाळेत सुरक्षारक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षकही आहेत. सुरक्षारक्षक असतानाही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. १५ वर्षांत प्रथमच अशी घटना घडली आहे. (प्रतिनिधी)
कर्णबधिर शाळेतील मुलीवर अत्याचार
By admin | Updated: March 17, 2017 06:13 IST