शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

एटीएम हँग करून फसवणूक करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 04:51 IST

एटीएम हँग करून लोकांची फसवणूक करणाऱ्या सहा आरोपींना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपींमध्ये बॉलीवूडच्या एका निर्मिती व्यवस्थापकाचाही समावेश असून

ठाणे : एटीएम हँग करून लोकांची फसवणूक करणाऱ्या सहा आरोपींना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपींमध्ये बॉलीवूडच्या एका निर्मिती व्यवस्थापकाचाही समावेश असून, त्यांच्याकडून २६ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले.वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून, बँक ग्राहकांना लुबाडण्यामध्ये या प्रकरणातील आरोपी सराईत आहेत. एटीएम हँग करायचे किंवा ग्राहकाच्या नकळत त्याचे एटीएम कार्ड बदलायचे, या दोन युक्त्यांचा वापर आरोपींकडून केला जात होता. फसवणुकीसाठी आरोपी मुख्यत्वे ग्राहकांची गर्दी असलेले एटीएम निवड असत. आरोपी एटीएमवर पैसे काढण्यासाठी असलेल्या ग्राहकांच्या रांगेत उभे राहायचे. समोरचा ग्राहक पैसे काढत असताना, आरोपी दोन बोटांमध्ये स्वत:चे कार्ड पकडून कार्डाच्या मागील बोटाने एटीएमचे विशिष्ट बटन सतत दाबायचे. त्यामुळे एटीएम हँग होऊन ग्राहकाचे पैसे निघत नसत. त्या वेळी आरोपी मदतीसाठी पुढे येत असत. आरोपी स्वत:चे कार्ड स्वाइप केल्याचे भासवून प्रत्यक्षात ग्राहकाच्या खात्यातूनच पैसे काढत असत. काही ठिकाणी एटीएम हँग करून गडबडीत ग्राहकांचे एटीएम कार्ड बदलण्याचे प्रकारही आरोपींनी केले आहेत. ग्राहकांना लुटणाºया या टोळीची माहिती ठाण्यातील वागळे युनिट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली. ठाण्यातील अहमदाबाद मार्गावरील नायगाव येथे आरोपी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपींना नायगाव परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे १३ एटीएम कार्ड हस्तगत केले. आरोपींनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत अशा प्रकारचे २६ गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली.साथीदारांचा शोध सुरूया टोळीमध्ये आणखी साथीदार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी संतोष गिरी हा फिल्म सिटीमध्ये निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम करतो. फिल्म सिटीसाठी व्हॅनिटी व्हॅन, वेगवेगळ्या कामांसाठी लागणारी मुले आणि लाइटची व्यवस्था पुरविण्याचे कामही तो करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अमिताभ उर्फ आफताब जाहीर आलम खान, संतोष ओमप्रकाश गिरी, कमलेश बिकर्माजित यादव, विजय ओमप्रकाश पांडे, आलोक योगेंद्रप्रताप सिंग आणि अहमद हुसेन आलमगीर खान ही या प्रकरणातील आरोपींची नावे असून, ते मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत वास्तव्यास आहेत. सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असून, अमिताभ याच्याविरुद्ध उत्तर प्रदेशात फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्याला उत्तर प्रदेशातून तडीपारही केले होते. त्यामुळे आरोपींनी उत्तर प्रदेशातून बाहेर पडल्यानंतर मुंबई, ठाण्यात फसवणुकीचा धंदा सुरू केला.