शेणवा : शेणवा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा अत्यंत भोंगळ आणि अनागोंदी कारभार सुरू आहे. सामान्य नागरिकांना एका विद्युत कनेक्शन साठी दररोज हेलपाटे मारून दोन-तीन महिने वाट पहावी लागते. तर श्रीमंतांच्या फार्म हाऊसवर लगेचच ट्रान्सफॉर्मर बसविले जातात, अशी टीका नागरिक करतात.काही दिवसांपूर्वी अदिवली येथील कान्हे या फार्महाऊसवर ३१५ के.व्ही. चा ट्रान्स्फॉर्मर बसवण्याचे काम सहाय्यक अभियंता श्रीनिवासन यांनी स्वत: कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन केले. तेच जर एखाद्या शेतकऱ्याने मीटरसाठी अर्ज केला तर त्याच्याकडे जास्त पैशंची मागणी केली जाते आणि मीटर बसवायला कमीत कमी तीन चार महिने जातात. त्यातही अंतर जर १२० ते १४० फूट असेल तर मीटर दिला जात नाही उलट एखाद्या फार्महाऊसवाल्याकडून पैसे घेऊन कितीही अंतर असले तरी काम केले जाते. आउट सोर्सिंगचे कर्मचारी, वायरमॅन अनधिकृतपणे काम करतात. सामान्य नागरिकाला त्रास देणाऱ्या या कामचोर आणि मुजोर अधिकाऱ्यांबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यांच्यावर कारवाईची नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
सहाय्यक अभियंता की ठेकेदार?
By admin | Updated: January 25, 2017 04:46 IST