शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

अस्मानी संकट पालघरमधील शेतकऱ्यांची पाठ काही सोडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:48 IST

बळीराजा मेटाकुटीस: आधी दडी, मग अतिवृष्टी आणि आता ‘अवका‌ळी’

n  लोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे अस्मानी संकट लागले आहे. पेरणीला पावसाने ओढ दिली, लावणीला पुन्हा दडी मारल्याने ती खोळंबली, सप्टेंबरनंतर अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके आडवी होऊन कुजू लागली, तर आता थोडे-फार हाती आलेले आणि खळ्यावर गोळा केलेले पीक मळणी करून धान्य घरात आणत असताना, पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यात सतत तीन दिवस हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.पालघर जिल्ह्यात खरीपाचे १ लाख ५ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक भातशेतीचे ७५ हजार, १५ नागली, वरईचे १० हजार, तर इतर पिकाचे ५ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात मुख्य पीक भाताचे घेतले जाते. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. थोडे-फार राहिलेले पीक आता भिजून वाया गेले. या काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आणि नुकसान भरपाईची अंमलबजावणी शासनाने केली. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी खळ्यातील गंजीवर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकले, मात्र पिक भिजलेच. त्यामुळे यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासून अखेरपर्यंत अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही.‘सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी’ डिसेंबरमध्ये थंडीचे दिवस असताना अवकाळी पावसामुळे हवामानातील गारवा व आर्द्रता अधिक वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. सध्याच्या या विचित्र अशा हवामानामुळे सर्दी, पडसे, खोकला, ताप येणे, थंडी वाजणे व त्यातून इतर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच जिल्ह्यात कोरोना फैलावत असून, नागरिकांनी त्या दृष्टीने या का‌ळात आपापल्या आरोग्याची योग्य खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सर्वांना केले आहे.