शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमकार्डची माहिती विचारून गंडा

By admin | Updated: May 30, 2017 05:44 IST

बँक खात्याच्या अ‍ॅटोमेटेड ट्रेलर मशीन (एटीएम) च्या कार्डचा पासवर्ड विचारून एका खासगी बँकेच्या महिला खातेदाराला ३३ हजार ९९७ रुपयांचा

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बँक खात्याच्या अ‍ॅटोमेटेड ट्रेलर मशीन (एटीएम) च्या कार्डचा पासवर्ड विचारून एका खासगी बँकेच्या महिला खातेदाराला ३३ हजार ९९७ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ठाण्याच्या फुलेनगर भागात घडला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.फुलेनगर येथील एका १९ वर्षीय गृहिणीला २७ मे रोजी दुपारी १ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. फोन करणाऱ्याने एटीएमकार्ड कार्यालयातून बोलत असल्याची त्यांना बतावणी केली. आयसीआयसीआय बँकेचे एटीएम ब्लॉक होणार असल्याचे सांगून त्याने कार्डची माहिती आणि मेसेजवर येणारा वन टाइम पासवर्ड त्यांना विचारला. आपले एटीएमकार्ड बंद होईल, या भीतीने या महिलेने तो पासवर्डही दिला. नंतर, मात्र या भामट्याने त्यांच्या बँक खात्यातील ३३ हजार ९९७ रुपये फसवणुकीने काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने २८ मे रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.एल. भापकर याप्रकरणी तपास करीत आहेत.कोणत्याही बँकेतून खातेदाराच्या एटीएम किंवा कोणत्याही पासवर्डची माहिती विचारली जात नाही. यासाठी वारंवार बँकेकडूनही मेसेज पाठवले जातात. तरीही, ग्राहक अशा फोनला बळी पडतात. अशी कोणीही माहिती विचारल्यास ‘आम्ही बँकेत येऊनच माहिती देऊ’ असे बँक खातेदारांनी निक्षून सांगितले पाहिजे. कोणालाही अशी कोणतीही माहिती देऊ नये. -राजन जोशी, मुख्य व्यवस्थापक, लीड बँक, ठाणे