सदानंद नाईक, उल्हासनगर : गेल्या पाच महिन्याचे मानधन दिले नसल्याच्या निषेधार्थ आशा सेविकानी महापालिकेवर धडक मोर्चा काढला. अखेर मानधन देण्याचे आश्वासन आयुक्तानी आशा सेविकेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
उल्हासनगर महापालिका हद्दीत आरोग्य विषयक कामासाठी २१० आशा सेविका कार्यरत आहेत. केंद्र व राज्य शासनाकडून येणारे आशा सेविकेचे मानधन महापालिकेकडे येते. त्यानंतर महापालिका आरोग्य केंद्राकडे मानधन वर्ग केल्यावर आशा सेविकांना मानधन मिळते. मात्र गेल्या ऑक्टोबर पासून मानधन मिळाले नसल्याच्या निषेधार्थ आशा सेविकेने चेहऱ्यावर सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे घालून सोमवारी सुपारी महापालिकेवर धडक दिली. त्यानंतर त्यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांना निवेदन दिल्यावर, मानधन देण्याचे आश्वासन आयुक्तानी दिले. तर महापालिका वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी आशा सेविकेचे दोन महिन्याचे मानधन बाकी असल्याची माहिती दिली.