शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील पदपथावर कमानींचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:25 IST

चालायचे कसे? : पादचाऱ्यांनी विचारला सवाल, मंडपांमुळेही रस्ते अडले

डोंबिवली : खड्डे आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहनचालक , पादचारी यांना चालणे मुश्कील होऊन बसले आहे. त्यात आता गणेशोत्सवानिमित्त उभारल्या जाणाºया कमानींमुळे पदपथावर अडथळा निर्माण होत असल्याने आम्ही चालायचे कसे, असा प्रश्न पादचाऱ्यांकडून केला जात आहे. सध्या वाहतूककोंडीचा सामना करताना पादचाºयांसाठी पदपथ सोयीचे ठरत असले तरी नियम धाब्यावर बसवून कमानी उभारणाºयांवर केडीएमसी कारवाई करणार की कानाडोळा करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.शहरात गेल्यावर्षी गोकुळाष्टमीला उभारलेल्या कमानी दिवाळीपर्यंत कायम होत्या. परवानगी घ्या आणि शहर विद्रूप करा, असे धोरण यंदाही केडीएमसीने स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या धर्तीवर मंडप आणि कमानी उभारणीसाठी नियमावली प्रशासनाकडून जाहीर केली असली तरी कारवाईअभावी ते नियम कागदावरच राहत आहेत.पश्चिमेकडील महात्मा फुले रोडलगतच्या भागात अर्धा रस्ता मंडपाने व्यापलेला आहे. दरवर्षी हे चित्र कायम असते. तो रहदारीचा चौक असल्याने तेथे नेहमीच वाहतूककोंडी होत असते. त्यात मंडपाची भर पडते. दरम्यान, यावेळेलाही काही ठिकाणी लोखंडी कमानी उभारण्यात आल्या आहेत. या कमानी वाहतुकीला अडथळा ठरत असताना काही कमानींनी पदपथाचा आधार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.पूर्वेकडील छेडा पथावरील स.वा. जोशी हायस्कूलच्या चौकात उभारलेल्या लोखंडी कमानीने पदपथावर अतिक्रमण केले आहे. सध्या पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने येथील नजीकच्या ठाकुर्ली उड्डाणपुलावरून अवजड वाहनांसह अन्य वाहनांची वाहतूक सातत्याने सुरू आहे. त्यामुळे या चौकात प्रचंड कोंडी होत आहे. यात पादचाºयांकडून पदपथाचा वापर केला जातो. परंतु, आता त्यावरच कमान उभारल्याने चालायचे कसे, असा प्रश्न पादचाºयांना पडला आहे.