शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू समुद्रकिनारी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:37 IST

जिल्ह्यातील खाडी आणि समुद्रकिनारी खडकाळ व दलदलीचे भाग, कांदळवने या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांचा वावर आढळून आला आहे.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : यंदाही डहाणू समुद्रकिनाऱ्यालगत नारंगी छातीची हरोळी आणि अन्य दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन घडत आहे. पालघर जिल्ह्याला पक्ष्यांचा समृद्ध वारसा लाभल्याने ऋतुनुसार नानाविध जातींचे देशी-परदेशी स्थलांतरित पक्षी दृष्टीस पडत आहेत. हिवाळ्यात अशा दुर्मीळ पक्ष्यांच्या आगमनाने पक्षी अभ्यासक आणि पक्षी निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील खाडी आणि समुद्रकिनारी खडकाळ व दलदलीचे भाग, कांदळवने या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांचा वावर आढळून आला आहे.हिवाळ्याच्या हंगामाला प्रारंभ झाला असून, समुद्रकिनारी सिगलांचे सहज दर्शन घडत असताना, पक्षी अभ्यासकांना नारंगी छातीची हरोळी, नीलिमा, पिवळ्या पोटाचा वटवट्या, काळ्या डोक्याचा खंड्या या पक्ष्यांनी दर्शन दिल्याने पक्षीनिरीक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. गतवर्षी जिल्ह्यात दुर्मीळ असणाऱ्या नारंगी छातीची हरोळी या पक्ष्याचे दर्शन डहाणूतील किनारी भागात झाले होते. यावेळी घरट्या शेजारी पक्ष्यांची दोन पिल्लेही दिसली होती. पावसाळ्याच्या प्रारंभी हा पक्षी घरटे बांधतो. राज्यात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात त्याचे वास्तव्य आहे. डहाणूतही वाढवण किनाऱ्यावर त्यांनी प्रजनन केल्याचे चिंचणीतील पक्षीनिरीक्षक भावेश बाबरे यांनी सांगितले.दरम्यान, उलट चोचीचा तुतारी, रंगीत तुतारी, हिरवा तुतारी, राखी चिखल्या, सोन चिखल्या, चातक, नवरंग, काळा बगळा, पांढरा अवाक, निळपंख, पिवळ्या पायाची हरोळी (महाराष्ट्राचा राज्य पक्षी) अशा नाना जातींच्या स्थलांतरित पक्ष्यांचे येथे दर्शन ऋतुमानानुसार घडते. हे पक्षी एकेकटे तर काही वेळा थव्यांनी दर्शन देतात. जिल्ह्यात पक्षी अभ्यासकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली, तरी पक्षीनिरीक्षकांची संख्या वाढते आहे. कॅमेरा, मोबाइल आणि छोटी डायरी घेऊन हे पक्षीनिरीक्षक खाडी व समुद्रकिनारी भागात पायपीट करतात. यावेळी पक्ष्यांच्या हालचाली आणि आवाज ऐकल्यावर मिळणारी अनुभूती सुखद असल्याच्या प्रतिक्रिया शैलेश बाबरे, आशीष बाबरे, प्रवीण बाबरे या पक्षीनिरीक्षकांनी नोंदविली आहे.गतवर्षी नारंगी छातीच्या हरोळी पक्ष्यांनी वाढवण परिसरात येऊन प्रजनन केले होते. दुर्मीळ पक्ष्यांना डहाणू तालुका पसंत असल्याचे आढळून येते. पर्यावरणाबाबत हा समृद्ध वारसा आहे.- भावेश बाबरे, पक्षीनिरीक्षक