शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गाणी लावल्याच्या रागातून तरुणावर खुनीहल्ला करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

ठाणे: डेकवर भक्ती संगीत लावल्याच्या रागातून नरेश पांचाळ (२७, रा.वर्तकनगर, ठाणे) या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून खुनाचा प्रयत्न ...

ठाणे: डेकवर भक्ती संगीत लावल्याच्या रागातून नरेश पांचाळ (२७, रा.वर्तकनगर, ठाणे) या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाºया रघु उर्फ रघुवीर छाब्रा (२७, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अटक केली. लोखंडी रॉडने मारल्यानंतरही त्याने नरेशला ठार मारण्याची धमकी दिल्याने संताप व्यक्त होत आहे.

नरेश हा साईनाथनगर येथील पाइपलाइन ब्रिजच्या शेजारी असलेल्या सार्वजनिक शौचालयात गेला होता. त्याच वेळी त्याच्या शेजारी राहणारा रघू उर्फ रघुवीर छाब्रा याने डेकवर भक्तीसंगीत वाजविल्याचा रागातून १ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आधी शौचालयाच्या दरवाजावर त्याने लाथ मारली. नंतर लोखंडी रॉडने दरवाजा ढकलून दिला. ‘तू फार गाणी वाजवितोस, तू बाहेर ये. मी तुला जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणत नरेशच्या डोक्यात लोखंडी रॉडने फटका मारून त्याला गंभीर जखमी केले. आपला जीव वाचविण्यासाठी तो तिथून पळून जात असताना, त्याचा पाठलाग करून पुन्हा रिक्षा स्टॅन्डच्या बाजूला असलेल्या एका दुकानासमोर लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर दोन वेळा जोरदार प्रहार केला. यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांच्या पथकाने रघूला मंगळवारी रात्री अटक केली.