शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

रोकड लंपास करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:32 IST

नौपाडा पोलिसांची कामगिरी : ३६ हजारांच्या रोकडसह रिक्षाही केली जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नव्यानेच सुरू केलेल्या दुकानासाठी सुट्या पैशांची गरज असल्याचे भासवून मालाची डिलिव्हरी करणाऱ्यांकडून ३६ हजारांची रोकड लुबाडणाºया फय्याज उस्मान मेमन (२९, रिक्षाचालक, रा. जोगेश्वरी) यास नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रिक्षाही जप्त केली असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते.लोकमान्यनगर येथील रहिवासी प्रदीप गुणाजी गराटे (५४) हे त्यांच्या साक्षीदारासह ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या नौपाड्यातील भास्कर कॉलनी येथील किराणा दुकानात त्यांच्या एजन्सीच्या मालाची डिलिव्हरी देण्यासाठी आले होते. त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना नौपाडा परिसरात आपण नव्याने दुकान सुरू केल्याची बतावणी केली. या दुकानातही त्यांना विविध मालाचा भरणा करायचा असल्याचे सांगून त्यांचा विश्वासही संपादन केला.त्याच परिसरातील ‘श्री मांगल्य’ या इमारतीमध्ये वास्तव्याला असल्याचाही बहाणा करून व्यवसायासाठी सुट्या पैशांची निकड असल्याचे भासविले. त्यांच्याकडे मालाच्या डिलिव्हरी करताना जमा झालेली ३६ हजारांची रोकड त्यांच्याकडून घेतली. त्याबदल्यात बंदे पैसे त्याच्या वडिलांकडून घेण्यासाठी प्रदीप आणि त्याच्या साथीदाराला ‘श्री मांगल्य’ या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पाठवून ते दोघेही तिथून पसार झाले होते.त्यानंतर, प्रदीप यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर रोजी फसवणुकीची तक्रार दाखल केली.सीसीटीव्हीच्या आधारे तपासवरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीच्या कॅमेºयामधील चित्रणाची पाहणी केली. तेव्हा फसवणूक करणाºयाचा आणखी एक साथीदार रिक्षा घेऊन आल्याचे आढळले. त्याच रिक्षातून दोघेही पळून गेल्याचे उघड झाले. या सीसीटीव्हीतील फुटेजच्या आधारे तसेच परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजमार्फत रिक्षाचा क्रमांक मिळवूनफय्याज मेमन या रिक्षाचालकाला १४ सप्टेंबर रोजी रात्री मोरे यांच्या पथकाने अटक केली. त्याने या लुटीसाठी वापरलेली रिक्षा जप्त केली असून त्याच्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.