शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास अटक

By admin | Updated: September 27, 2016 03:32 IST

लग्नाच्या भूलथापा देऊन भांडुप येथे राहणाऱ्या एका १६ वर्षांच्या मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या ऋषिकेश जाधव (२२, रा. भांडुप) याला मुंबई लोहमार्ग गुन्हे अन्वेषण विभागाच्या

कल्याण : लग्नाच्या भूलथापा देऊन भांडुप येथे राहणाऱ्या एका १६ वर्षांच्या मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या ऋषिकेश जाधव (२२, रा. भांडुप) याला मुंबई लोहमार्ग गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण शाखेने आणि मुंबई शहर गुन्हे अन्वेषण विभाग-५ यांनी सापळा रचून दापोली येथून अटक केली आहे.ऋषिकेशने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आश्वासन दिले. २५ एप्रिल २०१४ ला त्याने तिला ठाणे रेल्वे स्थानकातून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या अजोबांनी ठाणे रेल्वे स्थानकात आपल्या नातीचे अपहरण झाल्याची तक्रारही दिली होती. मात्र, या तपासाला कोणत्याही प्रकारची गती मिळत नव्हती. अखेर, आजोबांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. तेव्हा न्यायालयाने मुंबई लोहमार्ग गुन्हे अन्वेषण, कल्याण विभाग आणि मुंबई शहर गुन्हे अन्वेषण विभाग-५ यांना संयुक्तपणे तपासाचे आदेश दिले. त्यानुसार, मुंबई लोहमार्ग गुन्हे अन्वेषण कल्याण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, मुंबई शहर गुन्हे अन्वेषण विभाग-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत आणि सहायक पोलीस आयुक्त गाडगीळ यांनी तपास सुरू केला. तेव्हा त्यांना भांडुपमधल्या स्थानिक खबऱ्या आणि फेसबुकद्वारे ऋषिकेश दापोली येथे राहत असल्याचे समजले. तेथे सापळा रचून रविवारी ऋषिकेशला अटक केली. (प्रतिनिधी)मुलगी आजोबांकडे ऋषिकेश पीडित मुलीसह भाड्याच्या खोलीत राहत होता. तो एका खाजगी कं पनीत नोकरी करत होता. सध्या मुलीला आजोबांच्या स्वाधीन केले आहे. तर ऋषिकेशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.