शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तस्करीसाठी कासवांची मागणी करणाऱ्याला वनखात्याने केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 06:26 IST

तस्करीसाठी कर्नाटक, आंध्रमधून आणलेली सुमारे ५३० कासवे येथील वनखात्याने कुर्ला टर्मिनस येथून सुमारे १२ दिवसांपूर्वी हस्तगत केली होती.

- सुरेश लोखंडे ठाणे : तस्करीसाठी कर्नाटक, आंध्रमधून आणलेली सुमारे ५३० कासवे येथील वनखात्याने कुर्ला टर्मिनस येथून सुमारे १२ दिवसांपूर्वी हस्तगत केली होती. या कासवांना आणणारी महिला आजही कोठडीत आहे. तिच्या साहाय्याने तस्करीसाठी या कासवांची मागणी करणाºयास वनखात्याच्या यंत्रणेने नुकतीच कुर्ला येथून अटक केली आहे. तोही सध्या तुरुंगात आहे.कर्नाटक , आंध्र प्रदेशातून कासवाची ५३० पिल्ले रेल्वेद्वारे कुर्ला येथे आणण्यात आली होती. कासवांच्या या तस्करीची माहिती वनअधिकाºयांसह डीआरआय आणि डब्ल्यूसीसीबीच्या अधिकाºयांना मिळताच त्यांनी सापळा रचून कुर्ला टर्मिनसवर कर्नाटकच्या शोपी (३४) या महिलेला कासवांसह रंगेहाथ पकडले होते. या महिलेकडून अन्यही तस्करीची माहिती मिळविण्यासह कासवांची मागणी करणाºयाचा शोध वनखात्याच्या यंत्रणेने घेतला. यानुसार, या चौकशी पथकाने कुर्ला (पूर्व) येथील जागृतीनगरमधील रहिवासी अब्दुल कादर इमामसाब हान्नुरे यास अटक केली आहे. सध्या तो ठाणे येथील जेलमध्ये असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.तस्करीसाठी आणलेल्या या कासवांना कर्नाटकच्या जंगलात सोडण्यासाठी ठाणे न्यायालयाने तत्काळ परवानगी दिली. कर्नाटकमधील हवामानात जगणाºया या कासवांना तेथे सोडणे अपेक्षित असल्यामुळे काही दिवसांनी कर्नाटक न्यायालयाने तशी परवानगी येथील वनखात्याची मिळवली. सुमारे आठ दिवसांपेक्षा अधिक दिवस ठाण्यातील वनखात्याचा पाहुणचार घेणाºया कासवांना वनखात्याच्या पथकांनी कर्नाटकमध्ये सोडल्याचे कंक यांनी सांगितले. तत्पूर्वी या कासवांचे मेडिकल करण्यासह त्यांचे सुस्थितीत खानपानही वनखात्याकडून करण्यात आले. आता त्यांना कर्नाटकटला सोडले आहे. आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.