शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

बापाचा बदला घेण्यासाठी मुलीची निर्घुण हत्या करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:35 IST

भिवंडी : दुकानातील उधारीवरून झालेल्या भांडणांत बापाने मारहाण केल्याचा राग मनांत ठेऊन बदला घेण्याच्या उध्देशाने त्याच्या चार वर्षाच्या मुलीची निर्घुण हत्या करून तीचे दोन्ही हात छाटले.तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी चक्रे फिरवून पळालेल्या आरोपीस भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी बिहारमधून अटक केली.आबेद मोहम्मद अजमीर शेख(२०)असे शेजारच्या चार वर्षाच्या मुलीची ...

ठळक मुद्देदुकानातील उधारीवरून बापाने मारहाण केल्याचा रागचार वर्षाच्या मुलीची हत्या करणारा वीस वर्षाचा यंत्रमाग कामगारमुलीचे दोन्ही हात दंडापासून तोडून निर्घुण हत्या

भिवंडी : दुकानातील उधारीवरून झालेल्या भांडणांत बापाने मारहाण केल्याचा राग मनांत ठेऊन बदला घेण्याच्या उध्देशाने त्याच्या चार वर्षाच्या मुलीची निर्घुण हत्या करून तीचे दोन्ही हात छाटले.तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी चक्रे फिरवून पळालेल्या आरोपीस भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी बिहारमधून अटक केली.आबेद मोहम्मद अजमीर शेख(२०)असे शेजारच्या चार वर्षाच्या मुलीची हत्या करणाºया आरोपीचे नांव असून तो यंत्रमाग कामगार आहे. शहरातील रोशनबाग येथे मोहमदीया मजीद जवळील गौतमचाळीत महादेव सरजू प्रसाद हे आपल्या कुटूंबासह रहात असून त्याच ठिकाणी त्यांची पानटपरी आहे. शेजारी रहाणा-या आबीदने त्यांच्या पानाच्या दुकानांतून दिड हजार रूपयांचे उधारीचे सामान घेतल्याने महादेव प्रसादने त्यास हटकले. त्यावरून झालेल्या भांडणात महादेव प्रसाद याने आबेदला मारहाण केली. त्याचा राग आल्याने आबीद याने १ एप्रिल रोजी महादेव प्रसादची चार वर्षाची मुलगी पायल ही घराबाहेर खेळत असताना तीचे अपहरण केले होते. त्याच दिवशी तीची निर्घुण हत्या करून तीचे दोन्ही हात दंडापासून तोडून टाकले. तसेच उजव्या पायाची बोटे तुटलेल्या स्थितीतील मृतदेह घराजवळ असलेल्या टावरे कंपाऊण्ड येथील निर्जनस्थळी झुडूपात टाकून दिले.दरम्यान मुलीचे वडील महादेव प्रसाद याने आपली मुलगी पायल(४)हिचे १ एप्रिल रोजी अपहरण केल्याची तक्रार भोईवाडा पोलीस ठाण्यात केली. या दरम्यान पोलीस तपास करीत असताना ४ एप्रिल रोजी गौतमचाळी जवळील टावरे कंपाऊण्डमध्ये झुडूपात सडलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह सापडला. तीच्या चपलेवरून मृतदेहाची ओळख पटली. परंतू या मृतदेहाचे हात दंडापासून कापलेल्या स्थितीत आढळून आले होते. पोलीसांनी हा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह जे.जे.रूग्णालयांत शवविच्छेदनासाठी नेला. तेंव्हा मुलीच्या डोक्यावर प्रहार झाल्याने तीचा मृत्यु झाला असून नंतर तीचे हात कापले आहे.तसेच उजव्या पायाच्या पंजाची बोटे तोडल्याचा शवविच्छेदन अहवाल डॉक्टरानी दिला. त्यानुसार पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. यासाठी पोलीसांचे तीन पथक काम करीत होते. गौतमचाळीत पोलीस आल्याचे पाहून आबेदने शहरातून बिहार येथे जाण्यासाठी पळ काढला. तो बिहार येथील मरोना तालुक्यातील गणेशपुर येथील आपल्या घराकडे जात असताना पोलीस त्याच्या मागावर होते. पोलीसांनी त्यास गणेशपुर येथे काल रोजी अटक केली. मयत पायल हिच्या वडीलाने उधारीवरून आबीद शेख यास मारहाण केल्याप्रकरणी बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने पायलचा खून केल्याचे कबूल केले,अशी माहिती पोलीस उपायुक्त सुनिल भारव्दाज यांनी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी पोलीस सह आयुक्त दिलीप गावीद व भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजय भिसे , पोलीस निरिक्षक (गुन्हे) आर.पी.मायने उपस्थित होते.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMurderखून