शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:23 IST

ठाणे : मागील सहा महिन्यांपासून घुसखोर बांगलादेशींना आश्रय देणार्या शरद भांने या घरमालकाला बुधवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक ...

ठाणे : मागील सहा महिन्यांपासून घुसखोर बांगलादेशींना आश्रय देणार्या शरद भांने या घरमालकाला बुधवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्या घरमालकाने पोलीस कारवाईतून बचावासाठी बोगस अ‍ॅग्रिमेंट तयार केले. तसेच बांगलादेशींकडे मिळालेले शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, मतदान कार्ड बोगस असल्याचीही बाब उघडकीस आली आहे. त्याच्यासह पकडलेल्या बांगलादेशींना येत्या २० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही बांगलादेशी नागरिक अनधिकृतरीत्या वास्तव्यास असून त्यामध्ये अहमदनगर येथील स्रेहालय या रेस्क्यू होममधून पळालेल्या दोन महिला असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या पथकासह मानपाडा पोलिसांनी ढोकळीगाव, आडिवली येथे संयुक्तरीत्या शुक्रवारी १२ आॅक्टोबर छापा टाकून सात जणांना अटक केली. त्यामध्ये एका भारतीय महिलेसह प्रत्येकी तीन बांगलादेशी पुरुष आणि महिला समावेश आहे. याचदरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू असताना, एखादे घर भाड्याने देताना त्याबाबत माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे.त्या अनुषंगाने तपास सुरू असताना घरमालक शरद भांने यांनी तशी कोणीही माहिती पोलिसांना दिली नसल्याची बाब पुढे आली. त्यानंतर त्याला अटक केली.तसेच बांगलादेशीला अटक झाल्याची माहिती समजताच त्याने तातडीने बोगस अ‍ॅग्रिमेंटही तयार केल्याचे तपास पुढे आहे. तसेच फायल आणि इमदादूल या दोघांकडे बांगलादेशी पासपोर्ट मिळून आले आहे. फायल हिच्याकडे भारतीय कागदपत्रे, आधारकार्ड आणि पॅनकार्ड मिळून आले आहेत.तर मोहम्मद शहाजान यांच्याकडे मिळालेले शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड आणि मतदान कार्ड हे बोगस असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच राखी तालुदार हिच्याकडेही आधार कार्ड आणि बँक पासबुक मिळून आले आहे. त्यानुसार, बनावट दस्तऐवज मिळाल्याप्रकरणी आणखी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर यांनी दिली.