शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सेना इच्छुकांची भाजपाकडून पळवापळवी

By admin | Updated: April 25, 2017 00:02 IST

मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरातील राजकारण तापू लागले असून इच्छुकांच्या पळवापळवीला सुरुवात झाली आहे.

राजू काळे / भार्इंदरमीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरातील राजकारण तापू लागले असून इच्छुकांच्या पळवापळवीला सुरुवात झाली आहे. यात शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्या इच्छुकांना परस्पर पळवण्याची शक्कल भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने लढवल्याने शिवसेनेसह स्वपक्षातही संतापाची लहर उमटू लागली आहे.भाजपात पक्षांतराची मांदियाळी सुरू झाली असतानाच शिवसेनेतही टप्प्याटप्प्याने पक्षप्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. पक्षप्रवेशासह मतदारांना आपल्या हाती राखण्यासाठी कार्यक्रमांची मेजवानी देण्यासही सुरुवात झाली असताना याच कार्यक्रमांची संधी साधून इच्छुकांचा पक्षप्रवेश उरकला जात आहे.विशेष म्हणते इच्छा नसतानाही इच्छुकांना जबरदस्तीने आपल्याच पक्षात प्रवेश देण्याचा आततायीपणाचा प्रत्ययही त्यांना येऊ लागला आहे. शिवसेनेने पक्षप्रवेशाचे एकूण पाच टप्पे तयार केले असून त्यातील दोन टप्पे पार पाडले आहेत. तिसरा टप्पा थेट मातोश्रीवर उरकण्यात येणार आहे. आ. प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षप्रवेशाचा सोहळा पक्षप्रमुखांच्याच हस्ते पार पाडण्यात येणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक कमलेश भोईर यांचा समावेश आहे. त्याची कुणकुण लागताच भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी भोईर यांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांमार्फत खेळी चालवली आहे. मात्र, भोईर यांना भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही कोणत्याही परिस्थितीत त्यांना पक्षात आणण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यातच, रविवारी भाजपाने मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अ‍ॅकॅडमी शाळेच्या मैदानावर कवी संमेलनाचे आयोजन केले होते. त्यात भोईर यांचे मुंबईतील मित्र राजेश शर्मा यांचा त्यांच्या समाजातर्फे सत्कार असल्याने राजेश यांनी त्यांना कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. मित्रत्वाच्या नात्याने भोईर कार्यक्रमाला गेले. ते आल्याचे लक्षात येताच त्यांना व्यासपीठावर बोलवण्यात येऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले. त्या वेळी भाजपा आ. राज पुरोहित यांच्या उपस्थितीत भोईर यांच्या गळ्यात पक्षाचे चिन्ह असलेला कापडीपट्टा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला भोईर यांनी नकार दिल्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देऊन पक्षप्रवेश दिल्याचे घोषित करण्यात आले.