शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची अभद्र युती, महासभेत गदारोळ : प्रभाग समित्यांच्या प्रस्तावावरून भाजपाला शिवसेनेने पाडले एकाकी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 06:14 IST

ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा नव्याने प्रभागरचना केली असून त्यामध्ये वाढलेली लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, महासभेत त्यांच्या मुद्यावरून आपल्या सोयीनुसार आपले प्रभाग दुस-या प्रभाग समितीत जाऊ नयेत, यासाठी प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अभद्र युतीचे दर्शन शुक्रवारी महासभेत घडले.

ठाणे : ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा नव्याने प्रभागरचना केली असून त्यामध्ये वाढलेली लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, महासभेत त्यांच्या मुद्यावरून आपल्या सोयीनुसार आपले प्रभाग दुस-या प्रभाग समितीत जाऊ नयेत, यासाठी प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अभद्र युतीचे दर्शन शुक्रवारी महासभेत घडले. भाजपाचा या प्रक्रियेला असणारा विरोध डावलून सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रभाग समित्यांचा प्रस्ताव मतांच्या जोरावर आपल्या सोयीनुसार मंजूर करून भाजपाला एकाकी पाडले.ठामपाची यंदाची निवडणूक ही नव्या प्रभागरचनेनुसार झाली आहे. त्यानुसार, ठाण्यात ३३ प्रभाग असून त्यामधून १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. सध्या १० प्रभाग समित्या कार्यरत आहेत. तर, जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ आहे. या निवडणुकीत ३३ प्रभागांतील प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून आले आहेत. नवीन प्रभागरचनेमुळे अनेक प्रभागांत फेरफार झाले आहेत. नव्या रचनेनुसार नऊ समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही वर्षांपूर्वी नव्याने निर्माण केलेली लोकमान्यनगर- सावरकरनगर प्रभाग समिती आता कमी झाली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पटलावर आला होता. परंतु, भौगोलिकदृष्ट्या प्रभाग क्र. १९ हा वागळेमध्ये येत असल्याने तो वागळे प्रभाग समितीमध्ये टाकावा, अशी मागणी भाजपाचे गटनेते मिलिंद यांनी करून तो कोपरीतून वगळावा, अशी मागणी केली. याच मुद्यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये तू तू मंै मैं सुरू असतानाच विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पालिकेच्या प्रभाग समितीमधील प्रस्तावात काहीसे बदल सुचवून रायलादेवी प्रभाग समितीचे नाव यापुढे वर्तकनगर प्रभाग समिती असेल आणि शीळ दिवा प्रभाग समितीचा उल्लेख केवळ दिवा प्रभाग समिती असेल, असा ठराव मांडला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील त्याला अनुमोदन दिले. परंतु, भाजपाने याला विरोध दर्शवून ही चुकीच्या पद्धतीने रचना केली जात असल्याचा आरोप केला. भाजपाचा विरोध मावळत नसल्याने सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मतदानाची मागणी केली.शिवसेनेने भ्रष्ट अधिकाºयाला पाठीशी घातल्याने भाजपाचा सभात्यागठाणे : महापालिकेतील घनकचरा विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या मुद्यावरून गुरुवारच्या महासभेत चांगलाच गदारोळ झाला. हळदेकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका शासनाने ठेवला असून तसे पत्रदेखील महापालिकेला दिले आहे. मात्र, तरीही सभागृह नेते हळदेकरांच्या बाजूने उभे राहिल्याने आणि या मुद्याला बगल देऊन पुढच्या विषयाला महापौरांनी सुरुवात केल्याने अखेर संतापलेल्या भाजपाच्या सर्वच नगरसेवकांनी सभात्याग केला. सभागृह नेते नरेश म्हस्के भ्रष्ट अधिकाºयांच्या पाठीशी उभे राहतात, असा गंभीर आरोप नारायण पवार यांनी केला. या आरोपामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला.डॉ. हळदेकर यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा मुद्दा विधानसभेत आ. संजय केळकर यांनी उपस्थित केला. या प्रकरणावरून त्यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखण्याबरोबरच अकार्यकारीपदावर नियुक्ती करणे क्र मप्राप्त असताना ते अजूनही घनकचरा विभागात नियुक्त असल्याने या मुद्यावरून भाजपाचे नगरसेवकही आक्र मक झाले. यासंदर्भात पवार यांनी थेट पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र देऊन त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी केली होती. गेली काही वर्षे हळदेकर या विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांची बदली अद्याप का झालेली नाही, यावरून सध्या पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.केळकर यांच्या प्रश्नावरून शासन उपसचिवांनी ठामपाकडून यासंदर्भात चार आठवड्यांत अहवाल मागवला होता. शासनाच्या या पत्रावर महापालिकेने काय कारवाई केली, असा मुद्दा नगरसेवक पवार यांनी उपस्थित केला. विक्र ांत चव्हाण यांनीदेखील हळदेकर या पदाला पात्र आहेत का, असा मुद्दा उपस्थित करून खुलासा मागितला. मात्र, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी शासनाचे कोणतेही पत्र आले नसून अधिकाºयांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले. म्हस्के यांच्या वक्तव्यामुळे भाजपा नगरसेवक आक्र मक झाले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण या गोंधळात खुलासा करू शकले नाहीत. अखेर, महापौरांनी या विषयाला बगल देऊन थेट पुढच्या विषयांना सुरु वात केल्याने संतापलेल्या भाजपा नगरसेवकांनी सभात्याग केला.