शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील भरतीत स्थानिकांसाठी सेना आग्रही

By admin | Updated: May 2, 2017 02:32 IST

कित्येक वर्षे रखडलेली ठाणे महापालिकेतील आरक्षक भरती प्रक्रिया अखेर मागील वर्षी मार्गी लागल्यानंतर आतापर्यंत ३२७ च्या आसपास

ठाणे : कित्येक वर्षे रखडलेली ठाणे महापालिकेतील आरक्षक भरती प्रक्रिया अखेर मागील वर्षी मार्गी लागल्यानंतर आतापर्यंत ३२७ च्या आसपास आरक्षक नव्याने पालिकेत समाविष्ट झाले आहेत. परंतु, यामध्ये ठाणे जिल्ह्यातील केवळ १८ उमेदवारांना संधी मिळाल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक होणार आहे. सत्ताधारी शिवसेनेने स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी हालचाली सुरू केल्या असून येत्या सर्वसाधारण सभेत त्यासंबंधीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.ठाणे महापालिका आस्थापनेवरील रिक्त पदांसाठी प्रशासन भरती प्रक्रिया राबवत असते. प्रत्येक भरती प्रक्रियेदरम्यान पालिका सेवेत स्थानिकांना सामावून घेण्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून होते. मात्र, भरती प्रक्रि येत स्थानिकांना सेवेत सामावून घेण्यासंबंधीचा धोरणात्मक निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. परिणामी, राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची पालिका सेवेत निवड केली जात असून त्यामध्ये स्थानिकांना फारसा वाव मिळत नाही. ठाणे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी आरक्षकपदाच्या ३२७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. त्यासाठी राज्यभरातून ४,१४१ उमेदवारांनी भाग घेतला. कित्येक वर्षे ही प्रक्रिया रखडलेली होती. मागील वर्षी ती मार्गी लागून ३२७ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील केवळ १८ उमेदवार पात्र ठरले. जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक ५० उमेदवार पात्र ठरले असून त्यापाठोपाठ नगर ३५, नाशिक २५, नांदेड २५, बीड २३ आणि उर्वरित इतर जिल्ह्यांतील उमेदवारांचा समावेश आहे. ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना महापालिका प्रशासनाने दिलेल्या पत्रातून ही माहिती उघड झाली आहे. भरती प्रक्रि येत जिल्ह्यातील केवळ १८ उमेदवार पात्र ठरल्याची बाब उघड होताच सत्ताधारी शिवसेनेने स्थानिकांना नोकरीत कोटा ठरवून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात महापौरांशी संपर्क साधला असता, स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे ही परिस्थिती उद््भवल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील १८ उमेदवारांत शहरातील उमेदवारांचा आकडा जेमतेम चार ते पाच आहे. त्यामुळे येत्या सर्वसाधारण सभेपुढे स्थानिकांना पालिका नोकरीमध्ये कोटा ठरवून देण्यासंबंधी प्रस्तावाची सूचना मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.