शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वाहनतळचालकाकडून मनमानी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:13 IST

मीरा रोड : मीरा रोडच्या कनकिया मार्गावर असलेल्या पालिकेच्या वाहनतळावर ठेकेदाराकडून पार्किंगसाठी मनमानी शुल्क वसूल केले जात आहे. याबाबतची ...

मीरा रोड : मीरा रोडच्या कनकिया मार्गावर असलेल्या पालिकेच्या वाहनतळावर ठेकेदाराकडून पार्किंगसाठी मनमानी शुल्क वसूल केले जात आहे. याबाबतची तक्रार पालिका आयुक्तांसह संबंधितांना करून ठेका रद्द करण्यासह अनामत रक्कम जप्त करण्याची मागणी केली गेली आहे.

शहराच्या विकास आराखड्यात शिवार उद्यानालगत कनकिया मार्गावर वाहनतळाचे २६४ अ हे आरक्षण आहे. सध्याच्या स्टार बाजारमागील या वाहनतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घाटनानंतरदेखील अनेक महिने वाहनतळ बंदच होते. अखेर, ओम साई सिद्धी या बेवर्ली पार्कच्या सॅण्डस्टोन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील सदनिकेचा पत्ता असणाऱ्या प्रमोद पांडे या ठेकेदारास १ आॅगस्ट २०१६ पासून ३१ जुलै २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी पालिकेने सदरचे पार्किंग भाड्याने दिले आहे. पहिल्या वर्षात प्रतिमाह ३६ हजार ३३३ रु., तर शेवटच्या तिसºया वर्षात ५४ हजार ४९२ रुपये प्रतिमाह पालिकेला देणे बंधनकारक आहे. सध्याचे तिसरे वर्ष चालू आहे. परंतु, सदर वाहनतळावर ठेकेदाराकडून मनमानी शुल्कवसुली केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या.खाजगी दुचाकी वाहनाच्या २४ तासांकरिता १२ रुपये, तर वाणिज्य वापराच्या दुचाकीसाठी ५० रु. शुल्क घेणे बंधनकारक असताना ठेकेदाराने कृष्णा यांच्याकडून खाजगी दुचाकीकरिता तब्बल ६० रु. उकळले. ठेकेदाराकडून दिलेल्या पावतीमध्ये ६० रु. शुल्क आकारल्याचे नमूद असून वाहनाचा पूर्ण क्रमांक व त्याचा प्रकार मात्र लिहिला जात नसल्याचेदेखील यानिमित्ताने उघड झाले.कंत्राटदाराला काळ््या यादीत टाकण्याची मागणीच्याप्रकरणी कृष्णा गुप्ता यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह महापालिका आयुक्त आदींकडे तक्रार केली आहे. ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याची अनामत रक्कम जप्त करा आणि संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे.च्मीरा रोडच्या वाहनतळ ठेकेदाराकडून मनमानी वसुलीप्रकरणी त्याचा ठेका रद्द करून अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई पालिकेने कृष्णा यांच्या तक्रारीवरून केली होती. पालिका अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे याकडे डोळेझाक होत आहे.

टॅग्स :mira roadमीरा रोडthaneठाणे