शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
3
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
4
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
5
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
6
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
7
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
8
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
9
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
10
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
11
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
12
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
13
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
14
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
15
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
16
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
17
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
18
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
19
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
20
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

एप्रिल २०१७ मध्ये ठाणे हागणदरीमुक्त

By admin | Updated: June 21, 2016 01:10 IST

जिल्ह्यातील गावखेड्यांना विळखा खातलेल्या हागणदरीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून सुटका होण्यासाठी हागणदरीचे वाढते प्रदूषण कायमचे रोखणे गरजेचे आहे.

ठाणे : जिल्ह्यातील गावखेड्यांना विळखा खातलेल्या हागणदरीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून सुटका होण्यासाठी हागणदरीचे वाढते प्रदूषण कायमचे रोखणे गरजेचे आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने वर्षभरात ३४ हजार शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील शंभर टक्के गावे हागणदीमुक्त होणार असल्याचा विश्वास पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मानसी बोरकर यांनी लोकमतकडे व्यक्त केला. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘ पर्यावरण संतुलीत गाव, इको व्हीलेज, या उपक्रमास अनुसरून बोरकर यांना बोलते केले असता त्या बोलत होत्या. आता प्रत्येक गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनव्दारे प्रत्येक कुटुंबास वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे. याशिवाय सार्वजनीक शौचालये बांधण्यासाठी देखील ग्राम पंचायतींना मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. यासाठी ‘आमचा गाव- आमचा विकास’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील १८७ ग्राम पंचायतींचे सर्वेक्षण विकास आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये हागणदरी निर्मुलन विकास आराखडा (ओडीईपी) तयार करून ३४ हजार ९८६ शौलयालये वर्षभरात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रत्येक कुटुंबियास सुमारे १२ हजार रूपये प्रोत्साहन अनुदानही दिले जाणार आहे.जिल्ह्यातील गावांचा २०१२ मध्ये पायभूत सर्वेक्षण (बीएलएस) करण्यात आले असता सुमारे दोन लाख पाच हजार ४८५ कुटुंबियांकडे शौचालय नव्हते. त्यापैकी आतापर्यंत एक लाख ७० हजार ९२८ कुटुबियांना मागील तीन वर्षांत शौचालय बांधून देण्यात आले. यापैकी मागील वर्षभरात २७ हजार ३३४ शौचालये बांधण्यात आली आहेत. याशिवाय आतापर्यंत कल्याण व आंबरनाथ हे दोन तालुके शंभर टक्के हागणदरी मुक्तही झाले आहेत. उर्वरित शहापूर, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यात शौचालये बांधण्यात येणार आहे. वर्षभरात बांधण्यात येणाऱ्या ३४ हजार ९८६ शौचालयांपैकी सर्वाधिक शहापूर तालुक्यात २१ हजार ६०० शौचालये बांधली जाणार आहेत. यामध्ये वैयक्तीक शौचालये, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, आदीव्दारे ती बांधली जाणार आहेत. त्यांसाठी बारा हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देऊन बांधून घेतले जाणार आहे. यामुळे एप्रिल २०१७ ला ठाणे जिल्हा हागणदरी मुक्त होणार असल्याचा दावा बोरकर यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)