शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा चेंडू नगरविकासमंत्र्यांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:42 IST

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक नियुक्तीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने संबंधितांची सुनावणी ...

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक नियुक्तीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने संबंधितांची सुनावणी घेतल्यावर ८ आठवड्यांत निर्णय देण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी नितीन मुणगेकर यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा चेंडू आता शिंदे यांच्या कोर्टात दाखल झाला आहे. दरम्यान, आधीच सदस्य नियुक्तीला विलंब झाला असून आता जेमतेम १५ महिन्यांचा कालावधीच शिल्लक आहे.

ऑगस्ट २०१७ मध्ये महापालिका निवडणुका होऊनही स्वीकृत सदस्य नियुक्तीबाबत सत्ताधारी भाजप व पालिका प्रशासनाने सुरुवातीपासून विलंब केला. कारण, भाजपच्या कोट्यात तीन सदस्य असताना चौघांनी उमेदवारी अर्ज भरले होते. स्वीकृत सदस्य नेमण्याबाबत निकष असताना सत्ताधारी भाजप, महापालिका प्रशासनासह शिवसेना आदींनी त्यांच्या राजकीय जवळीकांची वर्णी लावण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या वतीने ठाणे - पालघर भाजपा उपाध्यक्ष अनिल भोसले, माजी नगरसेवक भगवती शर्मा, निवृत्त पालिका अधिकारी अजित पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विक्रमप्रताप सिंह व काँग्रेसचे माजी नगरसेवक ॲड. शफिक खान यांची नावे समितीने निर्देश धुडकावून निश्चित केली.

भाजपने सेनेच्या उमेदवाराच्या संस्थेने कोरोनाकाळात जेवणाचे कंत्राट घेतल्याचा आक्षेप घेतला. महासभेत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या बळावर सेनेच्या उमेदवाराच्या नावाला कात्री लावत भाजपचे तीन व काँग्रेसच्या एका उमेदवारास स्वीकृत म्हणून नेमण्याचा ठराव केला. याप्रकरणी आ. गीता जैन यांनी सरकारकडे हा ठराव रद्द करण्याची तक्रार केली होती. त्यावर नगरविकास विभागाने त्यास स्थगिती दिली होती. दरम्यान, मुणगेकर यांनी या नियुक्त्या सरकारी निर्देशाप्रमाणे विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या केल्या गेल्या नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने स्वीकृत सदस्य नेमण्यास स्थगिती दिली होती.

भाजपचे उपमहापौर हसमुख गेहलोत, भाजपच्या भोसले, शर्मा व पाटील या तिन्ही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत राज्य सरकार, नगरविकास मंत्री शिंदे, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आ. जैन व मीरा-भाईंदर महापालिकेविरोधात याचिका दाखल केली होती. शिंदे यांनी महापालिकेसह सर्व संबंधितांची सुनावणी घ्यावी व त्यावर ८ आठवड्यांच्या आत योग्य तो निर्णय घ्यावा. निर्णय दिल्यानंतर चार आठवड्यांपर्यंत त्याची अंमलबजावणी करू नये, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.