शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनाच्या खर्चास पाच वर्षांनंतर मंजुरी; ७३ कोटी खर्च केल्याचे झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:06 IST

भिवंडी पालिका : प्रत्येक वर्षाचा खर्चाचा हिशेब व १४३ पानांचे पुरावे सादर केले आहेत. राऊत यांच्या चौकशीच्या मागणीमुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.     

नितीन पंडित भिवंडी : पालिकेच्या आरोग्य विभागाने घनकचरा व्यवस्थापनावर पाच वर्षांमध्ये तब्बल ७३ कोटी खर्च केले असल्याची बाब समोर आली आहे. या पाच वर्षांच्या खर्चास त्या त्या वर्षात झालेल्या महासभेची मंजुरी न घेता नुकत्याच झालेल्या महासभेत या खर्चास महासभेने मंजुरी दिली आहे. या खर्चात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अरुण राऊत यांनी केला आहे. 

या संदर्भातील पुरावेही राऊत यांनी आरोग्य विभागाकडून घेतले असून, ते आयुक्तांकडे सादर केले आहेत. मागील पाच वर्षांत केलेल्या खर्चास पाच वर्षांनंतर मंजुरी मिळाल्याने यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी तसेच ही मंजुरी तत्काळ रद्द करावी, अशी मागणीही राऊत यांनी आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडे पुराव्यानिशी सादर केली आहे. भिवंडीतील कचरा उचलण्यासाठी महापालिकेने खासगी कंत्राटदारांकडून घंटागाडी, जेसीबी पोकलेन, बुलडोझर, काॅम्पेक्टर, डम्पर भाड्याने घेतले आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी १ जुलै २०१५ मध्ये कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा काढल्या होत्या. मात्र, २४ सप्टेंबरपर्यंत एकही निविदा न आल्याने प्रशासनाने २०१५ पासून घनकचरा व्यवस्थापनासाठी लागणारी वाहने छोट्या कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेतली आहेत. २०१५ पासून या वाहनांच्या भाड्यापोटी आरोग्य विभागाकडून कोट्यवधींचा खर्च झाला आहे. या खर्चाच्या मान्यतेसाठी आरोग्य विभागाने दरवर्षी झालेल्या खर्चाला मान्यता त्या वर्षीच्या महासभेत घेणे आवश्यक होते. 

मात्र, तसे न करता पाच वर्षांनंतर १२ मार्च २०२१ मध्ये झालेल्या महासभेत ७३ कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. कोरोना काळात झालेल्या ऑनलाईन महासभेत घाईघाईने व बेकायदा पद्धतीने ७३ कोटींच्या खर्चास महासभेची मान्यता मिळण्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. प्रत्येक वर्षाचा खर्चाचा हिशेब व १४३ पानांचे पुरावे सादर केले आहेत. राऊत यांच्या चौकशीच्या मागणीमुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.     

अधिकाऱ्यांच्या बडतर्फीसाठी पाठपुरावा या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास आरोग्य विभागातील भ्रष्टाचार समोर येईल. भ्रष्ट अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून, या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी व सत्ताधाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अरुण राऊत यांनी केली आहे.

 

टॅग्स :bhiwandiभिवंडी