शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्याच्या 450 कोटी  रुपयांच्या आराखड्यास  मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 20:41 IST

जिल्हा वार्षिंक योजनेसाठी (सर्वसधारण) अंतर्गत सन 2021-2022 च्या आराखड्यासाठी 332.95 कोटी   रुपयांची मर्यादा शासनाकडून देण्यात आली होती.

ठाणे : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ठाणे  जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत (सर्वसाधारण) 2021-2022 या वर्षासाठी 450 कोटी  रुपयांच्या आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. जिल्हा वार्षिंक योजनेसाठी (सर्वसधारण) अंतर्गत सन 2021-2022 च्या आराखड्यासाठी 332.95 कोटी   रुपयांची मर्यादा शासनाकडून देण्यात आली होती. जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राज्यस्तरीय बैठकीत त्यानुसार नियतव्ययाच्या मर्यादेत  आराखडा सादर करण्यात आला होता. विविध विभागांची अधिकची मागणी लक्षात घेऊन  117 कोटी  रुपयांचा वाढीव म्हणजेच 450 कोटी रुपयांच्या आराखड्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीस राज्याचे नगर विकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,  जि.प.अध्यक्षा सुषमा लोणे,सर्व आमदार, विभागीय आयुक्त आण्णासाहेब मिसाळ,  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे , आदी उपस्थित होते.

 भिवंडी तालुक्यातील सवाद येथे सध्या असलेले कोविड रुग्णालय हे कायमस्वरुपी  जिल्हा रुग्णालय करण्यासाठी निधीची मागणी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व  जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाशी विचार विनिमय  करुन येत्या अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन श्री पवार यांनी दिले.

कोकण विभागातील  सर्व  जिल्ह्यांपैकी  खालील निकषांची पुर्तता करणाऱ्या एका जिल्ह्यास प्रोत्साहनपर आनुदान देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. यामध्ये  आय-पास प्रणालीचा प्रभावी वापर करणे, नियोजन समितीच्या नियमित बैठका घेणे, अखर्चित निधी कमी करणे, वेळेत प्रशासकीय मान्यता देणे, शाश्वत विकासाचे ध्येय प्रगती, अनुसूचित जाती–अनुसूचित जमाती घटकांसाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, नाविण्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी, वेळेत प्रशासकीय मान्यता देणे आदी कामांचा समावेश आहे

पालकमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध  सुविधांसाठी निधीची आवश्यकता असल्याने वाढीव निधी मिळण्याबाबत मागणी केली.   जादा निधी मंजूर झाल्यास योग्य नियोजनाच्या माध्यमातून जिल्ह्याची प्रगती होण्यासाठी मदत होईल असे पालकमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.  यावेळी  जिल्हाधिकारी .राजेश नार्वेकर  यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत होणाऱ्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या वाढीव निधीची माहिती दिली.

टॅग्स :thaneठाणे