शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीत चुकीच्या पध्दतीने विषयांना दिली मंजुरी

By admin | Updated: May 25, 2017 00:04 IST

अंबरनाथ नगरपालिकेच्या स्थायी समितीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या स्थायी समितीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रभागातील विकासकामांची यादी तयार नसतानाही परस्पर विषय मंजूर करून घेण्यात आले. त्यामुळे स्थायी समितीत मंजूर झालेले विषय नेमके कोणते होते याची कल्पना कोणत्याच नगरसेवकांना नाही. या आधीही सर्वसाधारण सभेत आणि स्थायी समितीच्या बैठकीत अशाच प्रकारे शहरातील विकासकामांना मंजुरी घेतली होती. या मंजूर विषयांमध्ये काही नगरसेवक आणि पदाधिकारी हे परस्पर आपल्या प्रभागातील विषय वाढवत आहेत. अंबरनाथ पालिकेत आर्थिक विषय मंजूर करताना त्या विषयांची टिप्पणी बंधनकारक केल्याने विषयाला मंजुरी देणे सोपे जाते. मात्र सहा महिन्यात आर्थिक विषय मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी चुकीची पध्दत अवलंबण्यास सुरूवात केली आहे. विषय समिती असो वा सर्वसाधारण सभा या दोन्ही सभेत प्रभागातील विषय मंजूर करताना नेमके कोणते विषय मंजूर केले याची यादी देणे गरजेचे आहे. यादीतील विषयांना मंजुरी दिल्यावर त्याचा ठराव करून त्यांच्या निविदा काढण्याचा नियम आहे. मात्र अंबरनाथ पालिकेत तीन वेळा विषयांची यादी निश्चित नसताना परस्पर आर्थिक विषयांना मंजुरी देण्याचे काम करण्यात आले. प्रत्येक नगरसेवकांचे विषय त्या पत्रिकेत असल्याने कोणताच नगरसेवक त्यास विरोध करत नाही. मात्र काही नगरसेवक याच संधीचा लाभ घेऊन परस्पर आपले वाढीव विषय अधिकाऱ्यांना दमदाटी करून टाकत आहेत. विषयांची यादीच निश्चित नसल्याने अधिकारीही दबंग नगरसेवकांच्या दबावाला बळी पडून परस्पर या यादीत विषय मंजूर करून घेत आहेत. थेट १ ते ५७ प्रभागांच्या आर्थिक विषयांना मंजुरी देण्याचा विषय घेऊन यादी नसताना हे विषय मंजूर केल्याने नेमक्या कोणत्या नगरसेवकांच्या प्रभागात किती विषय आले याची माहितीच मिळत नाही. १ ते ५७ प्रभागातील विषयांच्या यादीत वाढीव विषय समाविष्ट करुन हे विषय देखील मंजूर झाले असे दर्शविण्याचे काम पालिकेत सुरू आहे.