शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेच्या उमेदवारी अर्जास मंगळवारपासून प्रारंभ; आयुक्तांकडून कामाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 19:39 IST

लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना या प्रक्रियेतील प्रत्येक घटकाने आपापल्या कामाचे सूक्ष्म नियोजन करणे अपेक्षित आहे. या कालावधीत येणारे सण, उत्सव आदी साजरे होतांना आचारसंहिता भंग होणार नाही, याकडे लक्ष केंद्रीत करून आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश डॉ. पाटील यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेला दिले

ठळक मुद्देआचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश सण, उत्सव आदी साजरे होतांना आचारसंहिता भंग होणार नाही, याकडे लक्षदिव्यांग मतदारांना निवडणुका सुलभ व्हाव्यात

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. यासाठी तिन्ही मतदार संघांच्या निवडणूक अधीसूचनाही जाहीर होत आहे. यास अनुसरून कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटीलय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक यंत्रणेला सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते.लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना या प्रक्रियेतील प्रत्येक घटकाने आपापल्या कामाचे सूक्ष्म नियोजन करणे अपेक्षित आहे. या कालावधीत येणारे सण, उत्सव आदी साजरे होतांना आचारसंहिता भंग होणार नाही, याकडे लक्ष केंद्रीत करून आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश डॉ. पाटील यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेला दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामकजाचा आढावा डॉ. पाटील यांनी आज घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी नार्वेकर, यांच्यासह ठाणे लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, भिवंडीचे किशन जावळे, कल्याणचे शिवाजी कादबाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी तसेच सर्व नोडल अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.या बैठकीत सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील निवडणूक कामकाजाचा आढावा सादर केल्यानंतर डॉ. पाटील यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश जारी केले. जिल्ह्यात दिव्यांग मतदारांना निवडणुका सुलभ व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीन देखील त्यांनी उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच आगामी काळात सण, उत्सव आदी साजरे होतांना आचारसंहिता भंग होणार नाही याकडे काटेकोर लक्ष असू द्यावे, अशा सुचना ही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय मतदार सहायता केंद्रात आवश्यक त्या सर्व सुविधांची उपलब्धता करण्यावर निवडणूक यंत्रणेने काळजी घेण्याचे निर्देशही डॉ. पाटील यांनी यावेळी दिले.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक