शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश ३० जूनपर्यंत निश्चित करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

ठाणे : आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ करिता ज्या बालकांची निवड झाली आहे, त्यांनी ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावा. ...

ठाणे : आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ करिता ज्या बालकांची निवड झाली आहे, त्यांनी ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेत पालकांनी गर्दी करू नये. नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संतोष भोसले यांनी केले आहे. वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे १ ली ते ८ वीपर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे, यासाठी शासनाकडून दरवर्षी या घटकातील बालकांसाठी २५ टक्के शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीईअंतर्गत मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपांतील २५ टक्के प्रवेशासाठी ७ एप्रिल रोजी लॉटरीची प्रक्रिया राज्य स्तरावरून पूर्ण करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण ९०८८ अर्जांची निवड झाली आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल. परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर ‘प्रवेशाची तारीख’ या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याची तारीख पाहावी. प्रवेश घेण्यासाठी पाल्यांना सोबत नेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले.