शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रतील शिक्षणाचे चित्र हे निराशाजनक आहेत : अनुराधा भोसले 

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 27, 2023 18:05 IST

बालकामगारांचा प्रश्न हा तातडीने मिटला पाहिजे अशी कळकळीची मागणी त्यांनी केली.

ठाणे: शासन म्हणतेय वेठबिगार नाहीत पण प्रत्यक्षात वेठबिगार आहेत. महाराष्ट्रतील शिक्षणाचे चित्र हे निराशाजनक आहेत. बालकामगार हा या राज्याला शाप आहे. प्रत्येक बालकामगार आहे म्हणून तो शाळाबाह्य आहे आणि शाळाबाह्य असल्यामुळे तो बालकामगार आहे असे प्रतिपादन बाल कामगारांसाठी झटणाऱ्या अनुराधा भोसले यांनी केले. बालकामगारासारख्या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. 

बालकामगारांच्या विळख्यात अडकलेल्या लहान मुलांच्या पायाला दिशा देण्यासाठी अहमदनगरवरून कोल्हापूरला आलेल्या भोसले यांनी बालमजुरीच्या नावाखाली होणारी लहान मुलांची घुसमट, शोषण, अन्याय हे शोधून त्यांच्यासाठी अवनीच्या माध्यमातून त्या पुढे सरसावल्या. त्यांच्या कार्यासाठी समाजसेवक क्षेत्रासाठी त्यांना मृदगंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विठ्ठल उमप फाउंडेशन मृदगंध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी बाल कामगारांचे होणारे शोषण याकडे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले.

बालकामगारांचा प्रश्न हा तातडीने मिटला पाहिजे अशी कळकळीची मागणी त्यांनी केली. त्या म्हणाल्या की, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी अडीच लाखांमध्ये ऊस तोडायला वीटभट्टी कामगार येतात हे विदारक चित्र पाहिले तर अजून स्वतंत्र मिळायचा आहे का? हा प्रश्न पडतो. गोऱ्हे याना त्या म्हणाल्या की, विधानसभेमध्ये हा तारांकित प्रश्न उपस्थित केला पाहिजे. ऊसतोड कामगारांची मुले शाळेत का जात नाही याचा विचार शासनाने केला पाहिजे. बालकामगारमुक्त भारत असावे आपण क्रिकेटकडे संपूर्ण भाग डोळे लावून बसले होतो भारत जिंकावा यासाठी मनामध्ये प्रार्थना करत होतो. परंतु दुसरीकडे बालकामगारांच्या प्रश्नाकडे आपण पाहत नाही. महाराष्ट्राची बालकामगार हा प्रश्न इतिहास जमा होऊ शकतो त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.