शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: May 11, 2016 02:05 IST

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेत सोनाराला हाताशी धरुन दोन कोटी ७२ लाखांच्या सोने तारण कर्जाचा घोटाळा करणाऱ्या भास्कर मोरे या बडतर्फ शाखा व्यवस्थापकाचा अटकपूर्व जामीन

ठाणे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेत सोनाराला हाताशी धरुन दोन कोटी ७२ लाखांच्या सोने तारण कर्जाचा घोटाळा करणाऱ्या भास्कर मोरे या बडतर्फ शाखा व्यवस्थापकाचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. कदम यांनी फेटाळला. उर्वरित आरोपींच्या हंगामी जामीन अर्जालाही न्यायालयाने हरकत घेतली आहे. आधी घोटाळयातील पैसे भरा, मगच हंगमी जामिनासाठी अर्ज करा, असेही न्यायालयाने त्यांना बजावले. याच प्रकरणातील हिशेबनीस गावीतच्या अर्जावर १२ मे रोजी सुनावणी होणार आहे.टीडीसीच्या मोखाडा शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक मोरे, हिशेबनीस गावीत यांनी काही कर्जदारांशी संगनमत करुन ९६ लाख ९२ हजारांचे कर्ज बनावट सोने गहाण ठेवून वाटल्याचे उघड झाले. तसेच एक कोटी ७२ लाखांची १४ कर्जप्रकरणे अद्यापही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या प्रकरणात विजय दापत या कर्जदाराला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्याने मार्च २०१५ मध्ये बनावट सोने गहाण ठेवून ८६ हजारांचे कर्ज घेतले होते.शिक्षक संघाचे अध्यक्ष गणपत पाटील हेही संशयित आरोपी असून त्यांना यापूर्वी ७ मे रोजी हंगामी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मोरेसह बँकेच्या चार तत्कालीन अधिकाऱ्यांनी संगनमत करुन १७ कर्जदारांच्या संगनमताने दोन कोटी ७२ लाखांचे कर्ज अशाच प्रकारे काढले होते. वारंवार नोटिसा बजावूनही कर्जदार कर्ज फेडत नसल्यामुळे २८ एप्रिलला या सोन्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली. तेव्हा या बनावट सोने प्रकरणाचा भांडाफोड झाला. त्याचदरम्यान बँकेच्या खातेनिहाय चौकशीतही मोरे आणि गावित यांनी संगनमताने बोगस प्रकरणे मंजूर करुन सोने घोटाळा केल्याचे उघड झाले. त्यामुळे बँकेनेही त्यांना बडतर्फ केले. (प्रतिनिधी)