शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

विरोधी आमदारांनीही करावी बिलवसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:52 IST

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सरकारने विरोधी पक्षाच्या आमदारांनाही पत्र पाठवून कृषीपंपधारक वीजग्राहकांच्या वीजबिलांच्या वसुलीसाठी मतदारसंघात ग्राहक

आसनगाव/शहापूर : मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सरकारने विरोधी पक्षाच्या आमदारांनाही पत्र पाठवून कृषीपंपधारक वीजग्राहकांच्या वीजबिलांच्या वसुलीसाठी मतदारसंघात ग्राहक मेळावे आणि शिबिरे घेण्यास सांगितले आहे. सरकारचा हा अजब फतवा असून आमदारांना एवढेच काम बाकी होते का, असा सवाल शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी केला आहे. याबाबत नाराजी व्यक्त करून शेतकºयांचे वीजकनेक्शन खंडित केल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच कर्जमाफी आणि वीजबिल तत्काळ माफ करण्याची मागणीही केली आहे.शहापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. पांडुरंग बरोरा यांना पत्र पाठवून कृषीपंपधारक वीजग्राहकांच्या म्हणजेच शेतकºयांकडून वीजबिल भरणा करण्यासंदर्भात आपल्या मतदारसंघात मेळावे तसेच शिबिरे घेऊन महावितरणला सहकार्य करण्याबाबत पत्र पाठवले आहे. तर, कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकºयांचे वीजबिल भरण्यासाठी १५ दिवसांची म्हणजेच १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तर, १५ नोव्हें. पर्यंत शेतकºयांचे वीजकनेक्शन खंडित केले जाणार नाही. तसेच मुद्दल रकमेचे पाच हप्ते केले असून हे पाच हप्ते डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शेतकºयांनी भरावयाचे आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.या पत्रामुळे आ. बरोरा नाराज असून शेतकºयांना कर्जमाफी न दिल्याने तसेच परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेतकºयांना कर्जमाफी व वीजबिल माफ करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.