शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट, लढ्यासाठी महापालिका सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:28 IST

लढ्यासाठी महापालिका सज्ज : रुग्णवाहिका वाढवणे, डॉक्टर नेमण्याचा प्रस्ताव पटलावर

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठामपा हद्दीत काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने आता ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार, त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या हालचाली मनपाने सुरू केल्या आहेत. रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे, ताप सर्वेक्षणासाठी २५ खाजगी डॉक्टरांची नेमणूक करणे, बोरिवडे येथील काेरोना रुग्णालय सुरू करणे, अशी काही महत्त्वाची कामे मनपाने हाती घेतली आहेत. या सर्वच कामांचे  प्रस्ताव १९ मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवले आहे.

ठामपा हद्दीत कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, असा दावा मनपाकडून केला जात होता. परंतु, आता मनपाने शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगितले आहे. मागील काही दिवसांत शहरात कोरोनाचे दररोज १५० ते २५० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मनपा दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. रुग्णवाहिकांच्या सेवेसाठी दरपत्रक तयार केले आहे. त्यानुसार, कार्डिॲक रुग्णवाहिकेच्या १५ किमी सेवेसाठी मनपा सात हजार रुपये, त्यापुढे १६ ते २० किमीसाठी साडेआठ हजार, २१ ते २५ किमीसाठी साडेअकरा हजार आणि २६ ते ३० किमीसाठी साडेबारा हजार रुपये खर्च मनपा देणार आहे. आयुक्तांनी त्यासाठी पाच लाखांच्या खर्चास मान्यता दिली आहे. तर, मोठ्या साध्या रुग्णवाहिकेच्या १० किमीपर्यंतच्या सेवेसाठी ७०० रुपये, ११ ते २० किमीसाठी १,३०० रुपये, २१ ते ३० किमीसाठी १,७०० रुपये आणि ३० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी २५ रुपये प्रतिकिमी दराने आणि प्रतीक्षा कालावधीसाठी ७५ रुपये प्रतितास, असे पैसे मनपा देणार आहे. या कामासाठी २५ लाखांच्या खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी तापतपासणी मोहीम मनपाने हाती घेतली होती. त्याकरिता ३५ खासगी डॉक्टरांची मदत घेतली होती. रुग्ण घटताच केवळ सात डॉक्टर कार्यरत होते. परंतु, आता पुन्हा २५ खाजगी डॉक्टरांच्या मदतीने मनपा तापतपासणी मोहीम राबवणार आहे. त्यासाठी प्रतिमाह एका डॉक्टरला ६० हजारांप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिमाह १५ लाखांचा खर्च येणार आहे. तीन महिन्यांसाठी या डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे ४५ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. 

बोरिवडे येथील रुग्णालय करणार सुरू nघोडबंदर येथील बोरिवडे भागात एका संस्थेच्या मदतीने ठामपाने कोरोना रुग्णालय उभारले होते. मात्र, रुग्ण घटल्यामुळे ते सुरू झालेले नव्हते. मात्र, आता ते सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. nटाटा आमंत्र येथील प्रस्तावित विलगीकरण कक्षात पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकणे, पाण्याच्या टाक्या साफ करणे, पंप व मीटर दुरुस्ती आणि इतर कामे करणे, असा प्रस्तावही महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

परिचारिकांना मुदतवाढ कोरोना केंद्रे, आरोग्य केंद्रे, रुग्णालये येथे ४४ परिचारिका, १४ आया काही महिन्यांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची मुदत ३१ मार्च २०२१ ला संपत आहे. त्यामुळे त्यांना तीन महिने किंवा कोरोना संपेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे. त्यासाठी ३४ कोटी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

८१ जणांवर कारवाईकल्याण : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पोलीस व केडीएमसीने मागील दोन दिवसांत मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ८१ जणांवर कारवाई केली आहे. यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, ठरावीक वेळेत दुकाने चालू ठेवण्याचे आदेश असतानाही त्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत.

 

 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या