डोंबिवली : खचाखच भरलेल्या लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करत असताना डोंबिवलीतील भावेश नकाते या तरुणाचा पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच खोपोली-सीएसटी लोकलमधून ठाणे रेल्वे स्थानकाजवळ पडून नरेश पाटील (३२) याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. तो खोपोली ते ठाणे असा प्रवास करीत होता. मात्र लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने लोकलच्या दरवाजात तो लटकत उभा होता. दरम्यान, ठाणे-कळवादरम्यान हात सुटल्याने तो क्रिक ब्रिजमधून खाडीत पडला. त्याला खाडीतून बाहेर काढले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आणखी एक तरुण लोकलच्या गर्दीचा बळी
By admin | Updated: December 2, 2015 08:30 IST