शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रंगरंगोटीच्या कामात थुकपट्टी आमदार आव्हाडांचे पालिकेच्या विरोधात आणखी एक ट्विट

By अजित मांडके | Updated: February 15, 2023 17:50 IST

बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या जबरदस्त कलगीतुरा सुरु झाला आहे. त्यात आव्हाडांचे रोजच्या रोज टीव्टही सध्या वादळी ठरत आहे.

ठाणे : बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या जबरदस्त कलगीतुरा सुरु झाला आहे. त्यात आव्हाडांचे रोजच्या रोज टीव्टही सध्या वादळी ठरत आहे. त्यांनी आता टीव्ट करीत महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांवर निशाना साधला असतांनाच आता शहरभर सुरु असलेल्या रंगरंगोटीच्या कामाबाबतही त्यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रंगरंगोटीचे जे टेंडर काढण्यात आले आहे, त्यात ज्या काही अटी शर्तीने कामे होणे अपेक्षित होते, त्यानुसार कामे न होता केवळ थुकपट्टी लावली जात असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. हे टेंडर कोणाच्या मेहरबानीने कोणाला मिळाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

मागील काही दिवसापासून बाळासाहेबांची शिवसेना आणि आव्हाड यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. आता आव्हाडांचा अंत सुरु झाला असल्याचे भाष्य बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. तसेच विकास कामांच्या मुद्यावरुन देखील आव्हाड आणि बाळासाहेबांची शिवसेना यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आव्हाड यांनी आमदार निधीतून उभारलेली एलईडी स्क्रीन तोडण्यात आल्याने त्यांनी यावरुन महापालिकेवर निशाना साधला, त्यानंतर अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्तांवर देखील निशाना साधत होता.

आता थेट शहरात सुरु असलेल्या सुशोभरणाच्या कामावरच त्यांनी मोठो आक्षेप नोंदविला आहे. शहरात सुरु असलेल्या सुशोभीकरणाच्या आणि रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार शहरात ही कामे सुरु आहेत. परंतु असे असतांनाच रंगरंगोटीच्या कामावरुन आव्हाड यांनी ट्विट करुन महापालिकेला पुन्हा रडारवर आणले आहे.

काय आहे ट्विट

सध्या ठाण्यामध्ये रंगरंगोटीचे काम जोरदार सुरु  आहे. पण, मुळात टेंडरमध्ये ज्या अटी व शर्थी नमूद करण्यात आल्या आहेत; त्यामध्ये संपूर्ण भिंत खरवडून घेऊन त्याच्यावर पांढरा रंग मारु न तसेच परत एकदा रंगाचा हात मारु न मगच जी काही रंगरंगोटी करायची आहे ती करावी असे असताना, इथे मात्र तसे काहीही न करता सरळ भिंतीवर रंगकाम केले जात आहे. पावणे चारशे कोटी रु पयांचे हे टेंडर असल्याचे समजते. हे टेंडर कोणाच्या मेहरबानीवर मिळाले आणि कोण करीत आहे. त्यातही अशी थुकपट्टीची कामे का होत आहेत याकडे चे लक्ष आहे कि नाही. आतापर्यंत रंगरंगोटी झालेली सगळी कामे ही थुकपट्टीचीच आहेत. कमीत-कमीत यापुढे तरी टेंडरनुसार काम होईल हीच अपेक्षा.

टॅग्स :thaneठाणे