शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आणखी ५० द.ल.ली. पाणी हवे

By admin | Updated: May 30, 2017 05:32 IST

शहरातील भीषण पाणीटंचाई दूर करण्याकरिता एमआयडीसीकडून अतिरिक्त ५० दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन उपलब्ध करून

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरातील भीषण पाणीटंचाई दूर करण्याकरिता एमआयडीसीकडून अतिरिक्त ५० दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन उपलब्ध करून देण्याची मागणी महापौर मीना आयलानी यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. पाणीचोरीकरिता कुप्रसिद्ध असलेल्या शहराला जादा पाण्याची सोय करताना मुख्य जलवाहिनीवर मीटर बसवण्याची सूचनाही आयलानी यांनीच केली.उल्हासनगरातील ३०० कोटींची पाणीपुरवठा योजना ठप्प पडली असून गळतीमुळे लाखो लीटर पाणी नाल्यात जात आहे. पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी वाढीव निधीची मागणी महापालिका राज्य व केंद्र शासनाकडे करणार आहे. तत्पूर्वी पाणीटंचाईच्या समस्येपासून दिलासा देण्याकरिता अतिरिक्त ५० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी आयलानी यांनी केली. सध्या एमआयडीसीकडून पाठवण्यात येणारे पाणीबिल हे कोट्यवधी रुपयांचे असून ते भरण्याची महापालिकेची क्षमता नसल्याने बिल माफ करण्याची विनंती महापौरांनी केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने उद्योगमंत्र्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात महापौर आयलानी यांच्यासह उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी समिती सभापती कांचन लुंड, आमदार बालाजी किणीकर, माजी आमदार कुमार आयलानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, प्रकाश माखिजा यांचा समावेश होता. उल्हासनगरला सध्या दररोज १२० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. शहरात दिवसाआड तर काही ठिकाणी आठवड्यातून दोन दिवस कपात लागू आहे. पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार तब्बल ४० टक्के पाणीगळतीमुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत आहे. यामुळे पाणी असूनही अनेकदा नागरिकांना टंचाईचा सामाना करावा लागतो.