शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये आणखी ३०० बेडचे रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:16 IST

पालिकेचा निर्णय : अतिदक्षता विभागाचीही केली जाणार सोय

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अंबरनाथमधील डेंटल कॉलेजमध्ये ५०० बेडचे रुग्णालय उभारल्यानंतर आता त्याच ठिकाणी आणखी ३०० बेड वाढविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. यासोबतच शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या यूपीएससी सेंटरमध्ये ३०० बेडचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ठिकाणी ५० बेड अतिदक्षता विभागासाठी ठेवण्यात येणार आहेत.अंबरनाथ नगरपालिकेने डेंटल कॉलेज येथे उभारलेले कोविड केअर सेंटर आणि डीसीएचसी यशस्वी झाल्यानंतर आता पालिकेने गंभीर होणाऱ्या रु ग्णांनाही शहरातच उपचार मिळावेत यासाठी ३०० बेडचे डेडिकेटेड रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या रु ग्णालयात रु ग्णांवर खासगी रु ग्णालयाच्या धर्तीवर उपचार केले जाणार आहेत. शहरातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी हे रु ग्णालय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या संदर्भातील पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सोमवारी अंबरनाथमध्ये आले होते. त्यांनी डेंटल कॉलेजमधील वाढीव ३०० बेडच्या कामाची पाहणी केली, सोबतच यूपीएससी सेंटरमधील कक्षाचीही पाहणी करून अधिकाऱ्यांना कामाचे नियोजन दिले. शहरातील गरजू आणि गरिबांना खासगी रुग्णालयात आयसीयू उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ही परिस्थिती बदलण्यासाठी पालिकेने स्वत: आयसीयू कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कक्षाचे काम त्वरित सुरू करून ते चालवण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी स्पष्ट केले.खासगी डॉक्टर उभारत आहेत सिटी रुग्णालयसद्य:स्थितीत अंबरनाथमध्ये कोरोना रु ग्णांसाठी अतिदक्षता विभागाची सोय नसल्याने गंभीर रु ग्णांना अन्यत्र हलवावे लागत असल्यामुळे शहरातील खासगी डॉक्टरांनी एकत्र येऊन सुरू करत असलेल्या सिटी हॉस्पिटलला खासदार श्रीकांत शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी एकूण ७० बेडचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी २५ बेड अतिदक्षता विभागासाठी असतील.