शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका हद्दीतील ६६३८ जेष्ठ नागरीक महिलांना उदरनिर्वाहासाठी मिळणार वार्षिक १८ हजारांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:32 IST

ठाणे महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने यंदा पहिल्याच वर्षी जेष्ठ नागरीक महिलांसाठी देण्यात येणाऱ्या पात्र ठरणाºया लाभार्थ्यांची संख्या वाढविली आहे. त्यानुसार आता ६६३८ महिलांना वार्षिक १८ हजारांचे अनुदान मिळणार आहे.

ठळक मुद्देमहापालिकेवर पडणार ११ कोटी ९६ लाखांचा बोजालाभार्थ्यांची संख्या वाढली

ठाणे - ठाणे महानगरपालिका हद्दीतील ६० वर्षांवरील एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या ६ हजार ६३८ महिलांना उधरनिर्वाहासाठी वार्षिक १८ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. सुरवातीला केवळ ६३० लाभार्थी अपेक्षित धरण्यात आले होते. परंतु आलेल्या अर्जांची संख्या ही १२ हजार ५०० एवढी होती. त्यामुळे यातून मार्ग काढत यातील पात्र ठरेलेल्या जेष्ठ नागरीक महिलाना आता हे उदरनिर्वाहाचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.                           विविध योजने अंतर्गत महिलांना आणि दिव्यांगांना अनुदानाचे वाटप करण्यात येत आहे. या वर्षी ज्येष्ठ नागरीक महिलांनाही उदरनिर्वाहासाठी अनुदान देण्याची योजना आखली होती. परंतू त्याचे उद्दीष्ट फक्त ६३० लाभार्थ्यांपर्यंत मर्यादीत ठेवण्यात आले होते व त्यासाठी १ काटी १० हजार रु पयांची तरतूद करण्यात आली होती. परंतू योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला. सर्व प्रभाग समितीवर ज्येष्ठ नागरिक महिलांनी रांगा लावून अर्ज भरले. उद्दीष्ट फक्त ६३० इतकेच असल्याने ज्येष्ठ नागरिक महिलांमध्ये नाराजी पसरु न उद्दीष्ट वाढविण्याची मागणी होऊ लागली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरीक महिलांना सगळयांनाच वार्षिक उदरिनर्वाह भत्ता दयावा अशी मागणी महापौर मीनाक्षी शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राधीका फाटक यांनी केली होती. त्यानुसार १२ हजार ५०० अर्ज वितरीत झाले होते परंतू उदरिनर्वाह भत्ता मिळण्यास पात्र ६ हजार ६३८ अर्ज ठरले होते. त्यानुसार आता पात्र ठरलेल्या ६ हजार ६३८ ज्येष्ठ नागरिक महिलांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ११ कोटी ९६ लाख ८४ हजार रुपयांचा बोजा पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त