शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

मृतांच्या नातलगांना २ लाखांची मदत जाहीर

By admin | Updated: June 25, 2016 01:43 IST

डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत महिन्याभरापूर्वी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याचा व जखमींवरील वैद्यकीय उपचाराचा खर्च जिल्हाधिकाऱ्यांमार्फत

डोंबिवली : डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत महिन्याभरापूर्वी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याचा व जखमींवरील वैद्यकीय उपचाराचा खर्च जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लगेच देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिष्ट्वट करून जाहीर केला. ‘लोकमत’ने डोंबिवलीत शुक्रवारी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमात त्याच स्फोटातील मृत व जखमींना अद्याप मदत मिळाली नसल्याचा मुद्दा लावून धरला होता. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी टिष्ट्वट केल्याची माहिती भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आणि दुर्घटनाग्रस्तांना दिलासा मिळाला.स्फोटातील मृतांचे नातलग मदतीपासून वंचित असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारच्या ‘हॅलो’मध्ये ठळकपणे प्रसिद्ध केले. डोंबिवलीतील ‘बालभवन’मध्ये ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात ‘डोंबिवलीतील स्फोट : महिन्याभरानंतर...’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या सुशांत कांबळे यांची पत्नी सोनल हजर होत्या. आपल्या दीड वर्षांच्या मुलाच्या पालनपोषणाचा प्रश्न कसा आ वासून उभा आहे, ही व्यथा त्यांनी साश्रू नयनांनी मांडताच उपस्थित हेलावले. मृतांचे नातलग, जखमी आणि नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी उपस्थितांनी केली. त्याचवेळी चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या टिष्ट्वटची माहिती देताच उपस्थितांनी टाळ््यांचा कडकडाट केला.यावेळी भाजपा आमदार रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, ‘वनशक्ती’चे अश्वीन अघोर, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सुुभाष तुपे, ‘कामा’ संघटनेचे प्रतिनिधी व उद्योजक एन. व्ही. भागवत, सभागृह नेते राजेश मोरे, वास्तूविशारद राजीव तायशेट्टये, जागरुक नागरिक राजू नलावडे, ‘लोकमत’चे उप सरव्यवस्थापक राघवेंद्र शेट आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला स्फोटातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता कोणत्या उपाययोजना करता येतील याची चर्चा यावेळी झाली. श्रोत्यांनी एमआयडीसीचे अधिकारी, उद्योजक, आमदार, महापौरांना विविध विषयांवर थेट सवाल केले. चर्चेचे सूत्रसंचालन ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी केले. (सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात)