शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारेंचे ठाण्यात उपोषण

By admin | Updated: December 16, 2015 00:34 IST

रखडलेली १२५ कोटींची देणी मिळावीत, कोर्टाने आदेश देऊनही ६१५ कर्मचाऱ्यांना अद्यापही परिवहनने सेवेत सामावून न घेणे, यासह विविध मागण्यांसाठी परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी

ठाणे : रखडलेली १२५ कोटींची देणी मिळावीत, कोर्टाने आदेश देऊनही ६१५ कर्मचाऱ्यांना अद्यापही परिवहनने सेवेत सामावून न घेणे, यासह विविध मागण्यांसाठी परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाला जाग आणण्यासाठी ते २६ जानेवारीच्या मुहूर्तावर बंद पुकारून उपोषणाचे हत्यार उपसणार आहेत. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे स्वत: या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यापूर्वीही परिवहन कर्मचाऱ्यांनी वागळे आगारात वारंवार काम बंद आंदोलनाची हाक दिली होती. परंतु, आश्वासन देऊन त्यांचे आंदोलन शमविण्यात आले होते. मात्र, परिवहन प्रशासन आणि महापालिकेने त्यांच्या तोंडाला पानेच फुसली आहेत. परिवहन सेवा महापालिकेचे अंग असतांनादेखील तिला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, वारंवांर केवळ आश्वासनाची केवळ खैरात दिली जाते, परंतु प्रत्यक्षात थकीत देणी, सहावा वेतन आयोगाच्या फरकातील रक्कम, मेडीकल, प्रवास भत्ता आदींसह विविध स्वरुपाचे भत्ते मिळत नसल्याने यापूर्वी १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर बंदची हाक दिली होती. त्यांनंतर पाचव्या वेतन आयोगातील काही फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांची हाती पडली. परंतु उर्वरित सर्वच देणी अद्यापही परिवहन अदा करु शकलेली नाही. आजघडीला प्रत्येक कर्मचाऱ्याची ही थकीत देणी चार ते पाच लाखांच्या घरात गेली असून सेवेतील २३०० कर्मचाऱ्यांनी ती मिळावी म्हणून हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे.या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने, दोन वेळा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी येत्या २६ जानेवारीला हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या संदर्भात उद्या दुपारी कर्मचारी महापौर आणि व्यवस्थापकांची भेट घेणार आहेत. या भेटीतून काही सार्थ झाले नाही तर मात्र हे आंदोलन अटळ असल्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिला.तसेच या बंद विषयीचे पत्र जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त आदींसह पोलीस प्रशासनालाही दिले आहे. हजारे यांनी या आंदोलनाला पाठींबा देण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांना हे आंदोलन यशस्वी होईल, अशी खात्री वाटत आहे.