शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अंजूरफाटानाक्याची वाहतूककोंडी फुटणार, चालकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 22:48 IST

नव्या भुयारी मार्गाला परवानगी; अतिक्रमणे हटवली जाणार, कपिल पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसह केली घटनास्थळाची पाहणी

भिवंडी : अंजूरफाटा येथील चौकातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी रेल्वेमार्गाखाली बांधण्यात येणाºया भुयारी रस्त्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. भुयारी रस्त्याच्या कामासाठी अतिक्र मणांवरही लवकरच हातोडा पडणार आहे. रेल्वेमार्गाजवळील ७० कुटुंबे ४० वर्षे झोपड्यांमध्ये राहत असून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत शुक्र वारी या ठिकाणची पाहणी केली.भिवंडी-ठाणे रस्त्यावरील अंजूरफाटा येथील अरु ंद भुयारी रस्त्यामुळे वाहतूककोंडी होते. खड्ड्यांमुळे वाहनांच्या रांगा लागतात. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी रुंद भुयारी रस्त्याची मागणी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे २० सप्टेंबर २०१८ रोजी केली होती. त्याचबरोबर अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर, रेल्वे मंत्रालयाने नव्या भुयारी मार्गाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार, पाटील यांच्या उपस्थितीत रेल्वेचे वरिष्ठ अभियंता डी.डी. लोलगे, वरिष्ठ विभागीय अभियंता संतोषकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनिता परदेशी, पोलीस निरीक्षक (वाहतूक) कल्याण घेटे, दीपक पाटील आदींनी पाहणी केली. याप्रसंगी अंजूरफाटा येथील पुलाजवळच्या अतिक्रमणांची अधिकाºयांनी पाहणी केली. तसेच कामासाठी जागा मोकळी करण्यासाठी लवकरात लवकर अतिक्र मणे हटविण्याचे निर्देश दिले. या पुलासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार असून रेल्वेमार्गाखाली तयार बॉॅक्स करून टाकण्याचे प्राथमिक नियोजन आहे. त्यानुसार काम होणार आहे.अंजूरफाटा येथील नव्या रस्त्यामुळे वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. त्यासाठी या पुलाच्या कामासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.