शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:18 IST

ठाणे- भिवंडी रस्त्यावर कोंडी; एमएमआरडीएच्या कारवाईचा निषेध

भिवंडी : तालुक्यातील काल्हेर, कोपर ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या बेकायदा गोदामांच्या इमारतींवर एमएमआरडीएने कारवाई करावी असे आदेश सरकारने दिल्यामुळे संतप्त ग्रामस्थ व गोदाममालक यांनी मंगळवारी काल्हेर रास्ता रोको करत कारवाईस विरोध केला. ग्रामस्थांचा विरोध पाहता एमएमआरडीएचे अतिक्रमण विभागाचे पथक या भागात फिरकलेच नाही. दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना न देता केलेल्या रास्ता रोकोमुळे भिवंडी -ठाणे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या संख्येने गोदाम व्यवसाय वाढला असून नियोजन नसल्याने या भागात अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. २००९ मध्ये तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींचा समावेश एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात करण्यात आला. त्यानंतर ५१ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील बांधकाम परवानगीचे अधिकार एमएमआरडीएकडे आले. परंतु कोपर , काल्हेर , कशेळी या ग्रामपंचायत बहुतांश क्षेत्रात मोठ्या संख्येने गोदाम संकुले उभारली. दरम्यान एमएमआरडीएच्या कार्यालयातील भूमी व मिळकत शाखा सहायक आयुक्तांनी १५ जून रोजी सूचना काढून कोपर येथील सर्वे क्र. ३० ते ४२ आणि ४८ ते ५६ या शेतजमिनीवर अरिहंत कॉम्प्लेक्स नावाने इमारतींचे बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका ठेवत विकासक संजय देढिया यांना एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने हे बांधकाम मंगळवारी पाडणार असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. या घटनेचा धसका घेत परिसरांतील शेतकरी,गोदामधारक व गोदाममालक यांच्यात घबराट पसरली. त्यांनी संघटित होऊन भिवंडी-ठाणे मार्गावरील काल्हेर चौकात रास्ता रोको आंदोलन केले.५ ते ६ किलोमीटरपर्यंत रांगाएमएमआरडीएच्या या निर्णयाविरोधात केलेल्या आंदोलनात कृष्णकांत कोंडलेकर , माजी आमदार योगेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील, ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलनामुळे भिवंडी-ठाणे मार्गावर पाच ते सहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा होत्या. त्याचा त्रास विद्यार्थी, नोकरदार ांना झाला.