शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा; नोव्हेंबरपासून मानधन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:10 IST

मोदी सरकारचा केला निषेध; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

ठाणे : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडीसेविका, मदतनीस यांनी नोव्हेंबरपासून रखडलेल्या मानधनासाठी व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सुरू असलेली उपासमार, आर्थिक समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मोर्चा काढून सेविकांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनास धारेवर धरले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांची भेट घेऊन मोर्चेकरी सेविकांनी मागण्यांचे निवेदन दिले.महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील सेविकांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला. महागिरी येथून निघालेला हा मोर्चा पोलीस आयुक्तालयापासून पुढे शासकीय विश्रामगृहासमोर अडवण्यात आला. या मोर्चाचे तेथे सभेत रूपांतर झाले. यावेळी या कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी सेविकांना मार्गदर्शन केले. प्रलंबित मागण्यांसाठी ८ जानेवारीच्या देशपातळीच्या संपात सहभाग घेऊन मंत्रालयावर धडक देण्याचेही पाटील यांनी सांगितले. या नवीन सरकारमधील महिला बालविकासमंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय जागेवरून हटणार नसल्याचा निर्धारही पाटील यांनी सेविकांच्या तोंडून वदवून घेतला. यावेळी संघटनेचे बृजपाल सिंह, राजेश सिंह यांनीही मार्गदर्शन केले.केंद्र सरकारविरोधात घोषणायावेळी सेविकांनी सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे घालून या मोर्चात सहभाग घेतला होता. मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. मोदी सरकारचे करायचे काय... खाली मुंडके वर पाय, कोण म्हणतो देणार नाय... घेतल्याशिवाय राहणार नाय, आदी घोषणा देऊन सेविकांनी शासकीय विश्रामगृहासमोरील परिसर दणाणून सोडला. एकात्मिक बालविकास सेवा योजनेत काम करणाºया सर्व सेविकांना शासकीय दर्जा द्या.मानसेवी असे गोंडस नाव देऊन सेविकांकडून अल्पशा मानधनावर काम करून घेतले जात असल्याचा अन्याय तत्काळ दूर करा. नोव्हेंबरपासून रखडलेल्या मानधनाची रक्कम तातडीने अदा करावी. उपासमार थांबवण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मानधन द्या. सेविकेला तृतीय श्रेणी व मदतनीस यांना चतुर्थ श्रेणीचे वेतन व सेवेचे फायदे द्या. मानधनात भरघोस वाढ करा. निवृत्तीच्या दिवशी मिळालेल्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन देण्याचा निर्णय घ्या. आजारपणाची रजा लागू करा. लाभार्थ्यांच्या आहाराचे पैसे अ‍ॅडव्हान्स द्या, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेला यावेळी देण्यात आले.