शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

... आणि गोरगरीब लोकांच्या मदतीला धावले केणी कुटुंब, एका दिवसात १००० कुटुंबाना दिले घरपोच रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 18:41 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळव्यातील केणी कुटुंबांनी गोर गरीब जनतेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शुक्रवारी एका दिवसात तब्बल १००० कुटुंबांना केणी यांनी घरपोच रेशन दिले आहे. तसेच आपल्या पत्नीच्या कार्यालयात त्यांनी स्वत: दरात भाजीपाल्याची व्यवस्था केली आहे.

ठाणे : कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांचे हाल यामुळे सुरु झाले आहेत. मात्र अशा लोकांना सहारा देण्याचे काम, त्यांना महिन्याचे रेशन ते सुध्दा घरपोच देण्याचे काम सध्या कळव्यातील नगरसेवक मुकुंद केणी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने सुरु केले आहे. केणी हे स्वत: कळव्यातील विविध भागात फिरुन घरपोच रेशन देण्याचे काम करीत आहेत. त्यानुसार शुक्रवारी एका दिवसात केणी कुटुंबाने १००० कुटुबांना रेशन दिले आहे. तसेच पुढील काही दिवस ही सेवा अशीच सुरु ठेवण्यात येणार आहे.               कोरोना चा प्रार्दूभाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. परंतु यामध्ये सर्वसामान्य नागरीक, हातावरचे पोट असणारे, रोज कमवून रोज खाणारे असे असंख्य कुटुंब आहेत, की ज्यांना खाण्यासाठी देखील घरात काहीच नाही. अशा कुटुंबांचे तारणहार बनत आहेत, कळव्यात केणी कुटुंब. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, त्यांचे पती मुकुंद केणी, पुत्र मंदार केणी यांच्यासह कुटुंबातील प्रत्येकाने या कार्यात मोठा वाटा उचलला आहे. सध्या केणी कुटुंबाकडून कळव्यातील गोर गरीब, हातावरील पोट असणाऱ्यां कुटुंबाची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी मुकुंद केणी हे स्वत: प्रत्येकाच्या घरी जाऊन रेशन कीट देत आहे. दिवसभरात त्यांनी १००० कुटुंबांना रेशन दिले आहे. यामध्ये दोन किलो तांदूळ, एक किलो डाळ, एक किलो छोले, एक किलो साखर, एक लीटर तेल आणि एक फॅमीली पॅक बिस्कीटचा पुडा असे साहित्य पुरविले जात आहे. या कामात संपूर्ण केणी टीमने स्वत:ला झोकुन दिले आहे. याशिवाय कळव्यातील नागरिकांना भाजीपाला सहजगत्या उपलब्ध व्हावा याकरिता देखील केणी यांनी त्यांच्या पत्नी ठामपा विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांच्या बुधाजी नगर येथील जनसंपर्ककार्यालयात माफक दरात भाजीपाला विक्र ी केंद्र सुरू केले आहे. त्याचाही फायदा येथील रहिवाशांना होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आले आहे. परंतु आपली देखील काही जबाबदारी असल्याने अशा पध्दतीने आमच्या कुटुंबांने हे पाऊल उचलले आहे. पुढील काही दिवस अशा पध्दतीने गोरगरीब जनतेला ही मदत दिली जाणार आहे.(मुकुंद केणी - नगरसेवक , ठामपा) 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस