शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

...तर ‘व्हिजन डोंबिवली’ला निधी देणार

By admin | Updated: April 20, 2016 01:55 IST

अस्वच्छ शहराचा डाग पुसण्यासाठी ‘व्हिजन डोंबिवली’द्वारे तुम्ही केलेल्या निश्चयाच्या मी पाठीशी आहे. डोंबिवलीकरांनी डोंबिवलीकरांसाठी चालवलेल्या या लोकचळवळीसाठी ‘

डोंबिवली : अस्वच्छ शहराचा डाग पुसण्यासाठी ‘व्हिजन डोंबिवली’द्वारे तुम्ही केलेल्या निश्चयाच्या मी पाठीशी आहे. डोंबिवलीकरांनी डोंबिवलीकरांसाठी चालवलेल्या या लोकचळवळीसाठी ‘सीएसआर’चा निधी कमी पडल्यास महापालिका निधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिले.डोंबिवली शहर स्वच्छ, सुरक्षित व स्वस्थ करण्यासाठी डोंबिवलीत सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था व व्यक्ती यांच्या माध्यमातून ‘व्हिजन डोंबिवली कृती गट’ तयार केला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ कान्होजी जेधे मैदानात झाला. या वेळी संकेतस्थळाचेही उद्घाटन झाले. या वेळी देवळेकर बोलत होते. व्यासपीठावर डॉ. उल्हास कोल्हटकर, प्रज्ञेश प्रभुघाटे, दिलीप देशमुख, बाळू नेहते, राजेश कोरपे, अभिजित जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. देवळेकर म्हणाले की, ‘व्हिजन डोंबिवली’ची चार उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी डोंबिवलीकरांनी पुढाकार घेतला आहे. आता प्रश्न फक्त कल्याणचा आहे. तेथेही त्यासाठी २५ एप्रिलला बैठक होणार आहे. या चळवळीत लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. महापालिकेने एक नियमावली तयार केली आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यास दंड ठोठावणे, टाक्या साफ करणे आदी गोष्टींचा अंतर्भाव असेल. प्रत्येक वॉर्डात स्वच्छतादूत नेमले जाणार आहेत. उद्याने हिरवी करण्यासाठीही कार्यक्रम आखला जाईल. शहर स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न केले जातील. यासंदर्भात नागरिकांना काही सूचना करायच्या असतील तर त्यांनी त्या ‘व्हिजन डोंबिवली’ला कराव्यात, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. कार्यक्रमापूर्वी झालेल्या सायक्लोथॉनमध्ये २५० जणांनी सहभाग घेतला होता. त्याचा प्रांरभ अप्पा दातार चौकात झाला. त्यानंतर फडके रोड, बाजीप्रभू चौक, ओव्हरब्रीजमार्गे जाऊन तिचा कान्होजी जेधे मैदानात समारोप झाला.