शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अन्‌ दोघांचा फुलला संसार, पतीने दिली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पतीसोबत वाद झाला आणि ती मनोरुग्ण असतानाच घराबाहेर पडली. मधल्या काळात राहण्यासाठी संघर्ष करीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : पतीसोबत वाद झाला आणि ती मनोरुग्ण असतानाच घराबाहेर पडली. मधल्या काळात राहण्यासाठी संघर्ष करीत असताना एकेदिवशी भरकटत पोलिसांना आढळली. त्यांनी तिला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. अखेर बरे झालेल्या त्या महिलेला तिच्या पतीने आपल्या घरी परत नेले असून आता दोघांचा संसार छान फुलला असल्याची माहिती मनोरुग्णालयाने दिली. आता दोघेही आपल्या संसाराचे स्वातंत्र्य उपभोगत आहेत.

जवळपास ३२ वर्षांची ही महिला मुंबई येथे राहते. पतीसोबत वाद झाला अन्‌ ती घराबाहेर पडली. बहिणीकडे राहायला गेली असता तिनेही तिला नीट न सांभाळता घराबाहेर हकलून दिले. दरम्यान, तिच्यावर उपचार सुरूच होते. आई-वडील रत्नागिरीला असल्याने ती त्यांच्याकडे गेली पण समाजाच्या भीतीने त्यांनीही तिला ठेवून घेतले नाही. तिथूनही तिला घराबाहेर पडावे लागले. त्यानंतर ती मुंबईत परतली खरी पण ना बहिणीकडे गेली ना पतीच्या घरी. अशीच भरकटत असताना एकेदिवशी ती काशीमीरा पोलिसांना आढळली. त्यांनी तिला कायदेशीर कार्यवाही करून ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. मनोरुग्णालयाच्या समाजसेवा अधीक्षक नीलिमा केसरकर यांनी तिचे समुपदेशन केले. दोन ते तीन महिन्यांनी तिने पत्ता व पतीबद्दल माहिती दिली. तिचा पत्ता अत्यंत गोंधळात टाकणारा होता. तरीही प्रथम पतीची माहिती काढली व त्याच्याकडून सर्व हकीकत जाणून घेतली. त्यानंतर त्या दोघांचे केसरकर यांनी समुपदेशन केल्यावर पतीने तिला आपल्या घरी नेण्याची तयारी दर्शविली. मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय बोदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिची घरवापसी झाली. ती आपल्या पतीसोबत मनोरुग्णालयात उपचाराला येत असताना संसाराच्या गप्पा करीत होती, हे ऐकून आनंद झाल्याचे केसरकर यांनी सांगितले. आता पूर्ण ती बरी झाली असून दोघेही सुखाने एकत्र नांदत असल्याचे बोदाडे यांनी सांगितले.

-----------------

समुपदेशन आणि औषधोपचाराने मनोरुग्ण सामान्य जीवन जगू शकतो असे केसरकर यांनी सांगितले.