शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

चिखलगावातील प्राचीन शिल्पे नष्ट होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2015 03:55 IST

शहापूर तालुक्यातील किन्हवलीपासून चार किमी अंतरावर असणाऱ्या चिखलगावमध्ये असणारी प्राचीन दगडी शिल्पे स्थानिक ग्रामस्थ

धसई : शहापूर तालुक्यातील किन्हवलीपासून चार किमी अंतरावर असणाऱ्या चिखलगावमध्ये असणारी प्राचीन दगडी शिल्पे स्थानिक ग्रामस्थ व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असून या शिल्पांचे पुरातत्त्व खात्याकडून संशोधन करावे, अशी मागणी काही ग्रामस्थांकडून केली जात आहे. सुमारे ३५० लोकवस्ती असणाऱ्या चिखलगाव या महसूली गावापासून एक किलोमीटरवर जंगलात पांडवकालीन भवानीदेवीची मूर्ती व २०-२५ दगडी शिल्पे दोन किमीच्या परिघात पसरलेली आहेत. देवीच्या मूर्तीची ऊन-पावसात हेळसांड होऊ नये म्हणून चिखलगावकरांनी गेल्या वर्षीच जंगलात मूर्तीच्या ठिकाणी मंदिर उभारले आहे. मात्र, इतस्तत: पसरलेली ही दगडी शिल्पे अनेक वर्षांपासून ऊन -वारा-पाऊस यांच्या माऱ्याने झिजत आहेत. उभट आयताकृती दगडांवर घोड्यावर बसलेले शस्त्रधारी सैनिक, सिंहासनावर बसलेला राजा व सेवक, संभाषण करणारे स्त्री-पुरु ष, एकामागे एक जाणारे घोडेस्वार अशी चित्रे कोरलेली असून बरीच चित्रे अजूनही सुस्थितीत आहेत. ही शिल्पे केव्हा कोरली गेली असावीत, याची माहिती माझ्या आजोबांनासुद्धा नव्हती, इतकी ती जुनी आहेत, अशी माहिती या गावातील ७५ वर्षे वय असलेले ज्येष्ठ नागरिक केशव बाबू देसले यांनी दिली. मीनल चव्हाण माध्यमिक विद्यालय, चिखलगावचे मुख्याध्यापक कैलास धनाजी देसले यांनी या शिल्पांचे संशोधन व जतन व्हावे, याकरिता प्रयत्न सुरू केले असून पुरातत्त्व विभाग व ऐतिहासिक वस्तू व वास्तूंच्या संशोधनकार्यात रस असणाऱ्या तज्ज्ञांनी येथे भेट देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत, शहापूरचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना विचारले असता हे काम पुरातत्त्व विभागाने करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. हे कोरीवकाम व भवानीची मूर्ती पांडवकालीन असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून हा पुरातन ठेवा जतन करण्यासाठी प्रशासनाने पावले न उचलल्यास ही दुर्मीळ शिल्पे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.