शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आनंद आश्रम झाले शिवसेनेचे मुख्य केंद्र

By अजित मांडके | Updated: February 27, 2023 11:21 IST

टेंभी नाक्यावरील आनंद मठ आताचे आनंद आश्रम ऐतिहासिक वास्तू म्हणावी लागणार आहे. पूर्वी पारशी लोकांची ही जागा होती.

- अजित मांडके, प्रतिनिधीम्हाला शिंदे गट न म्हणता शिवसेना म्हणा, असे पहिले पत्र ठाण्यातील आनंद आश्रम येथून निघाले आणि शिवसेनेचे नव शिवसेना भवन हे आता ठाण्यात असेल, हे स्पष्ट झाले. त्यामुळे आनंद आश्रमाचे राजकीय महत्त्व आणखी वाढणार आहे. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांनी अनेक चळवळी, आंदोलने, शिवसेना मोठे करण्याचे काम केले. कधीही निवडणुकीची रणनीती या केंद्रातून आखली नाही. त्यासाठी सूर्या हे कार्यालय निश्चित केले होते. आता नव्या शिवसेनेचे मुख्य केंद्र हे आनंद आश्रम झाल्याने येथून निवडणुकीचे राजकारण चालणार की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी वेगळ्या जागेची निवड करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टेंभी नाक्यावरील आनंद मठ आताचे आनंद आश्रम ऐतिहासिक वास्तू म्हणावी लागणार आहे. पूर्वी पारशी लोकांची ही जागा होती. १९६८च्या सुमारास दिवंगत आनंद दिघे यांनी ही जागा भाड्याने घेतली. त्यासाठी १५० रुपयांच्या आसपास भाडे आकारले जात होते. तेव्हापासून याची ओळख आनंद मठ अशी झाली. येथून दिघे यांनी शिवसेना वाढीबरोबरच अनेक आंदोलने, चळवळी उभारल्या. हजारोंच्या संख्येने तरुणांना नोकरीचे अर्ज दिले गेले. अनेक बहिणी तासन् तास रांगेत उभे राहून दिघे यांना राखी बांधत होत्या. या आनंद मठातील एका छाेट्या खाेलीत त्यांचे वास्तव्य होते. दिघे यांच्या निधनानंतर त्यांची खुर्ची तेथे असून, शिवसैनिक येथे नतमस्तक हाेतात.आनंद मठाची वास्तू जुनी झाली हाेती. ती पाडून नवीन वास्तू बांधली. तिला वाड्याचे स्वरूप देण्यात आले असून, ‘आनंद आश्रम’ असे नामकरण झाले आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर या आनंद आश्रमाचे महत्त्व वाढले. शहरातील शाखा, आनंद आश्रम ताब्यात घेण्यावरून वादही रंगले. राजकीय घडामाेडींचे हे केंद्रबिंदू ठरले. शिंदे मुख्यमंत्री हाेताच, आनंद आश्रमातूनच शिवसेनेचा कारभार चालणार हे निश्चित झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रम असे त्याचे नामकरण केले.

निवडणुकीचे कार्यालय कोणते?शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळाले व त्याच्या काही क्षणांनंतर याच आनंद आश्रमातून पहिले पत्र धाडले गेले, तेव्हाच आनंद आश्रमातून शिवसेनेचा कारभार चालणार हे निश्चित.

या आनंद आश्रमात वेगळी ऊर्जा असल्याने, दिघे यांनी या ठिकाणाहून निवडणुकीची कामे केव्हाही केलेली नसल्याचे जाणकर सांगतात. त्यासाठी ते सूर्या या कार्यालयावर मुक्कामी असत. सूर्या या कार्यालयातून निवडणुका लागल्यापासून फॉर्म वाटप ते अगदी निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत दिघे यांचा मुक्काम असायचा. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणासाठी आनंद आश्रमाची निवड करणार की, सूर्या कार्यालयाकडे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे