शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये ठाणेकरांनी दिली भारतीय वस्तूंना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 01:13 IST

चीनमधून येणाऱ्या सर्व वस्तू भारतातच बनविल्या जाव्यात, अशी मागणी दुकान मालकांकडून होत आहे. किरकोळ विक्रेत्यांनाही चीनी वस्तुंची विक्री करण्याची इच्छा नसल्याचे नौपाडा व्यापारी मंडळाने सांगितले.

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भारत - चीन वादाचे पडसाद सर्वत्र उमटले असून त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवरदेखील झाला आहे. ग्राहक मोबाईलपासून अगदी एलईडी बल्बपर्यंत सर्वच वस्तू भारतीय बनावटीचे मागत असल्याचे दुकान मालकांनी सांगितले. चीनमधून येणाऱ्या सर्व वस्तू भारतातच बनविल्या जाव्यात, अशी मागणी दुकान मालकांकडून होत आहे. किरकोळ विक्रेत्यांनाही चीनी वस्तुंची विक्री करण्याची इच्छा नसल्याचे नौपाडा व्यापारी मंडळाने सांगितले.इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठी बाजारपेठ भारतात चीनला मिळाली. चीनमध्ये उत्पादनाचा आणि मजुरांचा खर्च कमी असल्याने तेथून येणाºया वस्तूंची किंमत तुलनेने कमी आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सीमेवर भारत - चीन वाद सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून सगळीकडेच चीनला आणि तेथून येणाºया वस्तुंना विरोध दर्शविला जात आहे. ९0 टक्के मोबाईल चीनमधून येतात. ते सर्वसामान्यांना परवडणारे असतात. त्यामुळे ग्राहक याच मोबाइलला पसंती देतात. परंतु भारत-चीन वादामुळे ग्राहक भारतीय बनावटीच्या मोबाईलची मागणी करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सुरुवातीला मोबाईल घेण्याआधी ग्राहक ब्रँड बघत नव्हते. पण आता मोबाईल चीनचा आहे का, असे विचारत असल्याचे मोबाईल दुकानाचे मालक मितेश शहा यांनी सांगितले. सध्या ग्राहक केवळ मोबाईल दुरुस्तीसाठी येतात आणि स्वस्त चिनी मोबाईल खरेदी करतात. जुलै अखेरपर्यंत भारतीय मोबाईल येणार आहेत, त्यामुळे ग्राहक आता त्याच्याच प्रतीक्षेत असल्याचे शहा म्हणाले.>एलईडी बल्ब, टॉर्च, विजेची तोरणे या वस्तू चीनमधून येत होत्या. परंतु आता एलईडी बल्बची केवळ लीड चीनमधून येते. चिनमधून येणारे टॉर्चदेखील बंद झाले असून विजेच्या तोरणामधील वायर भारतीय बनावटीची, तर त्यातील लीड चिनी आहे, असे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विक्रेते रवी जैन यांनी सांगितले. ग्राहक दुकानात आल्यावर भारतीय वस्तू दाखविण्यावर भर देतो. ग्राहकाने विचारले नाही, तरी वस्तू भारतीय बनावटीची आहे की चिनी, हे आम्ही स्वत:हून सांगत असल्याचे ते म्हणाले.