शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या इच्छुकांमध्ये ओमी पप्पू कलानीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:29 IST

उल्हासनगर विधानसभा : आयलानी, इदनानी यांनीही दिल्या मुलाखती

सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : उल्हासनगर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रदेश सचिव विक्रांत देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी, वादग्रस्त पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांच्यासह आठ जणांनी मुलाखती दिल्याने उमेदवारीसाठी भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

पक्षातील व्यक्तीस उमेदवारी देण्याचे ठरवले, तर मुख्य दावेदार कुमार आयलानी हे असून त्यांच्यासह पक्षाचे महापालिकेतील गटनेते जमनुदास पुरस्वानी, माजी शहराध्यक्ष महेश सुखरामाणी, ओमी कलानी, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, साई पक्षाचे नगरसेवक शेरी लुंड व कांचन लुंड यांनी मुलाखती दिल्या आहेत.

भाजपकडून कुमार आयलानी यांचे नाव आघाडीवर असले, तरी महापालिकेच्या सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या ओमी कलानी, साई पक्षाचे जीवन इदनानी यांनीही मुलाखती दिल्याने शहरातील सत्तेची समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. आयलानी यांच्या उमेदवारीला पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी व नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीच्या आ. ज्योती कलानी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असून त्यांनी सप्टेंबर महिन्यात पक्षप्रवेश केल्यास त्या स्वत: किंवा ओमी हेच भाजपच्या विधानसभा उमेदवारीचे प्रबळ दावेदार राहणार आहेत. महापालिकेत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी अर्धेअधिक कलानी समर्थक आहेत. पालिका सत्तेत महत्त्वाची भूमिका वठवणारे साई पक्षाचे जीवन इदनानी यांनीही उमेदवारीकरिता प्रयत्न केल्याने उल्हासनगरात प्रथमच चुरस पाहायला मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती कायम राहिल्यास कुमार आयलानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजपमधील काहींचे म्हणणे आहे. मात्र, युती तुटल्यास भाजप ओमी कलानी यांना रिंगणात उतरवेल, अशी चर्चा आहे.आयलानी-कलानी सामना रंगणारभाजप-शिवसेनेकडून कलानी कुटुंबातील कुणालाही उमेदवारी दिली गेली, तर शहर भाजपत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. आणि जर कलानी कुटुंबाला भाजपने डावलल्यास कलानी कुटुंब राष्ट्रवादी किंवा वंचित आघाडीच्या वतीनेही निवडणूक लढवेल, असे संकेत प्राप्त होत आहेत.पालिका निवडणुकीच्यावेळी भाजपने ओमी कलानी टीमला हाताशी धरून सत्ता स्थापन केली. त्यानंतर महापौरपदासाठीही भाजपने ओमी टीमला फार रडकुंडाला आणले होते. अगदी हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत जावे लागले होते.